Devendra Fadnavis -Eknath Shinde saam tv
मुंबई/पुणे

गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय; शिंदेंच्या खास माणसाचं भाजपला पत्र, महायुतीत वादाची ठिणगी

mahayuti politics : महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. गणेश नाईकांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे.

Vishal Gangurde

महायुतीतील वाद टोकाला

गणेश नाईकांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे भाजपला पत्रट

भाजप काय कारवाई करणार, याकडे लक्ष

महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते, मंत्री गणेश नाईक यांच्याकडून सातत्याने शिंदे गटाला लक्ष्य केलं जात आहे. गणेश नाईकांनी थेट शिंदे गटाचे नामोनिशान मिटवू, अशा इशारा दिला आहे. गणेश नाईकांच्या आव्हानानंतर शिंदे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे, असं म्हणत शिंदे गटाचे नेते, खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपला पत्र लिहिलं आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या पत्रानंतर भाजप काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

खासदार नरेश म्हस्केंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांना लिहिलेल्या पत्रातील ठळक मुद्दे

गणेश नाईक यांनी मित्र पक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललय.

एकेकाळी गणेश नाईक स्वतः शिवसैनिक होते. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करणे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे जाहीर रित्या मांडले

नाईकांनी जाहीरपणे, पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे वक्तव्य त्यांनी केलंय

मी शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात आली. यात भाजप आणि शिंदेंची मोठी भूमिका राहिली आहे. त्यानंतरच युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले. त्यानंतर कल्याण डोंबिवली ठाणे, मुंबई या ठिकाणी युती म्हणून लढत देऊन महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकात आपण मोठे यश मिळवलंय.

त्यांचं वक्तव्य पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो. परंतु पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक हे शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करताहेत.

काही बाबतीत विचार वेगळे आहेत. तरी एक हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांचे स्थिर सरकार त्यामुळेच देऊ शकलोत. परंतु, त्यांना हे बघवत नाहीये. त्यामुळेच कदाचित ते अशी मागणी करत असावेत.

आनंद दिघे असताना गणेश नाईकांना शिवसेनेने कशी धोबीपछाड दिली होती, ते त्यांनी एकदा आठवावं.

त्यांना त्याचे स्मरण करून द्यावे, बाकी शिवसेना त्यांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज आहे. नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत, अशा वल्गना नाईक करत होते. आम्ही 42 जागा निवडून आणून दाखवल्या आहेत. त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते.

शिंदेंवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करावे. त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत ही नम्र विनंती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंब्रात आज जितेंद्र आव्हाडांचा नागरी सत्कार, बाईक रॅलीकाढून शक्तिप्रदर्शन

Eyebrow Growth: सुंदर लांब अन् दाट भुवया वाढवायच्या आहेत? मग सोप्या स्टेप्स करा फॉलो

Valentine Day Love Letter: तुझी अन् तुझीच प्रेम वेडी, पण आपल्या प्रेमाला जात, समाजाच्या स्टेट्सची बेडी

KL Rahul : केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? स्वतःच केला मोठा खुलासा

Akshay Kumar: बांद्राच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये आहे या अभिनेत्रीचा फ्लॅट; अक्षय कुमारने केली पोल- खोल

SCROLL FOR NEXT