ED officials conduct searches at multiple locations in Mumbai and Delhi in connection with the HDIL money laundering case. saam tv
मुंबई/पुणे

200 कोटींचा कर्ज घोटाळा, ईडीचे एकाचवेळी 17 ठिकाणी छापे; मुंबई-दिल्लीत खळबळ

Massive ED Crackdown In HDIL Money Laundering Case Across Mumbai & Delhi: एचडीआयएल कर्ज गैरव्यवहार प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; मुंबई आणि दिल्लीतील 17 ठिकाणी छापे टाकत 50 लाखांची रोकड आणि 10 किलो चांदी जप्त. येस बँक आणि राणा कपूर यांचा कथित संबंध तपासात उघड.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 अंतर्गत एचडीआयएल (Housing Development & Infrastructure Ltd.) संबंधित कथित कर्ज गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात मुंबई आणि दिल्लीतील 17 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. ईडीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सुरक्षा परिसंपत्ती पुनर्निर्माण कंपनी लिमिटेड (SRC), सुरक्षा रिअॅल्टी लिमिटेड, ख्याती रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच संबंधित व्यक्तींच्या कार्यालये आणि इतर ठिकाणी ही शोधमोहीम राबविण्यात आली.

ही कारवाई केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने नोंदविलेल्या एफआयआरच्या आधारे करण्यात आली. या प्रकरणात सुमारे 200 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या मिळवून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ईडीच्या तपासात, एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांनी येस बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्यासोबत संगनमत करून 2011 ते 2016 या कालावधीत मेक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर सुमारे 200.30 कोटी रुपयांची सहा मुदत कर्जे फसवणुकीने मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, या कर्जाचा वापर मूळ उद्देशासाठी न करता एचडीआयएल समूहातील कंपन्यांची देणी फेडण्यासाठी करण्यात आला. तसेच मेक स्टार मार्केटिंगच्या काही मालमत्ता सहकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित केल्याचाही आरोप आहे. ईडीच्या मते, पुढील तपासात राणा कपूर यांनी या कर्ज व्यवहारांना मदत केल्याचे आणि सुरक्षा एआरसीमार्फत कर्ज खाते हस्तांतरित करून बुडीत मालमत्ता कृत्रिमरित्या पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. छापेमारीदरम्यान 50 लाख रुपयांची रोकड, 10 किलो चांदीचे बार, बँक लॉकर, डिजिटल उपकरणे तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

याशिवाय, समूहातील विविध कंपन्यांमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असून, या व्यवहारांद्वारे बुडीत कर्जांच्या अधिग्रहणासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT