bkctraffic  Saam Tv
मुंबई/पुणे

Missing Link News: BKCतील वाहतूक कोंडीचा त्रास होणार कमी; पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा 'मिसिंग लिंक' सोमवारी खुलणार

BKC Traffic News: वांद्रे-कुर्ला संकुल आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या १८० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे प्रवासातील १५ मिनिटांची बचत होणार आहे.

Saam Tv

BKC Eastern Highway Missing Link: वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी (BKC) हे मुंबईतील महत्त्वपूर्ण औद्योगिक केंद्र मानले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये या केंद्र संकुलामध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता तयार करण्यात आला. पुढे त्याचा विस्तार देखील करण्यात आला. वांद्रे-कुर्ला संकुलात प्रवेश करण्यासाठी पूर्वमुक्त मार्ग (Eastern freeway) यावरुन जोडरस्ता देखील उभारण्यात आला. परिणामी वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाला.

बीकेसीला जोडलेल्या जोडमार्गांचा संकुलातील अंतर्गत मार्गांवर परिणाम व्हायला लागला. गर्दीच्या वेळी जोडमार्गांवर वाहनांची संख्या वाढल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या वाढायला लागली. संकुलामध्ये जवळच्या ठिकाणी जाण्यासाठीही लोकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) उपाययोजना करण्यात आली. त्यात पूर्व द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे कुर्ला संकुल यांना जोडणारा रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

वांद्रे-कुर्ला संकुल ते पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा हा नवा रस्ता म्हणजेच मिसिंग लिंक तयार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारपासून हा रस्ता प्रवासाकरीता खुला करण्यात येणार आहे. या नव्या रस्त्यामुळे प्रवासातला १५ मिनिटांचा कालावधी वाचणार आहे. तसेच एमसीए क्लब, एमटीएनएल जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

‘बीकेसी कनेक्टर’च्या खालून जाणारा हा नवा रस्ता वांद्रे कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील भूखंड क्र. सी ७९ आणि सी ८० यांना जोडतो. हा रस्ता १८० मीटर लांब असून सेबी इमारत एवेन्यू ५ आणि एवेन्यू ३ या दरम्यान आहे. सहा मार्गिका असलेला हा रस्ता तयार करण्यासाठी ३.९८ कोटी रुपये इतका खर्च आला असल्याची माहिती एमएमआरडीएला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिसिंग लिंक पूर्ण झाल्याने प्रवास करताना १५ मिनिटांची बचत होईल असल्याने हा रस्ता खुला होणं ही मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे. सोमवारपासून मुंबईकर या रस्त्याने प्रवास करु शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT