Nagpur Crime: दुकानामध्ये घुसून जीवघेणा हल्ला, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूरमध्ये खळबळ

Father And Son Killed In Nagpur: नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना दोन जणांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Nagpur Crime: दुकानामध्ये घुसून जीवघेणा हल्ला, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूरमध्ये खळबळ
Father And Son Killed In NagpuSaam Tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये बाप-लेकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. नागपूरच्या रामटेके नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. दुकानामध्ये असताना या दोघांवार जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. नागपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना दोन जणांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शताब्दी चौक ते बेसा दरम्यान रामटेके नगर येथे वर्दळीच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. बाप-लेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Nagpur Crime: दुकानामध्ये घुसून जीवघेणा हल्ला, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूरमध्ये खळबळ
Nagpur Crime: धक्कादायक! ड्यूटीवर असताना स्वतःवर झाडली गोळी, नागपूरमध्ये जवानाच्या आत्महत्येने खळबळ

विजय सावरकर आणि मयूर सावरकर असं या बापलेकांची नावं आहेत. विजय सावरकर यांचे रामटेकनगरमध्ये घराजवळच फर्निचरचे दुकान असून शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या दुकानात चार ते पाच हल्लेखोर आले होते. जुन्या वादातून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान विजय सावरकर यांचा मुलगा वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये आला तर त्याच्यावर देखील हल्लेखोरांनी हल्ला केला.

Nagpur Crime: दुकानामध्ये घुसून जीवघेणा हल्ला, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूरमध्ये खळबळ
Nagpur Crime : महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणाीवर; टवाळखोरांकडून महिला पेट्रोल पंप मालकाला धमकी Video

या हल्ल्यामध्ये विजय सावकर आणि मयूर सावरकर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Nagpur Crime: दुकानामध्ये घुसून जीवघेणा हल्ला, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूरमध्ये खळबळ
Nagpur News: धक्कादायक! नागपुरात PSI ला धक्काबुक्की; घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com