Parliament Winter Session 2023 : ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’ घोषणाबाजी करु नका; खासदारांना हिवाळी अधिवेशनासाठी गाईडलाईन्स जारी

Guidelines For MPs News : सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सभागृहात अध्यक्षांनी केलेल्या आदेशाचे पालन केले जावे, असंही म्हटलं आहे.
Special Session of Parliament
Special Session of Parliamentsaam tv
Published On

प्रमोद जगताप

New Delhi News :

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सचिवालयाकडून खासदारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’, थँक्यू, थँक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी करू नये, अशी सूचना राज्यसभा सचिवालयाने केली आहे. सभागृहात अध्यक्षांनी केलेल्या आदेशाचे पालन केले जावे, असंही मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Special Session of Parliament
Rajasthan Exit Polls 2023: राजस्थानमध्ये परंपरा मोडणार? काँग्रेस पुन्हा येणार सत्तेत? एक्झिट पोलमधून समोर आली 5 कारणे...

सचिवालयाने काय सूचना दिल्यात?

>> सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखावी, राज्यसभेच्या अध्यक्षांच्या मंजुरीपूर्वी महत्त्वाचे विषय उपस्थित करण्यासंबंधीच्या सूचना प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहन केले आहे.

>> सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’, थँक्यू, थँक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी करू नये.

>> सभागृहात अध्यक्षांनी केलेल्या आदेशाचे पालन केले जावे. (Latest Marathi News)

>> सभागृहात किंवा बाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्यसभा किंवा लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करू नये.

>> प्रत्येक सदस्याने सभागृहात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना अध्यक्षांना नमस्कार करावा.

>> प्रत्येक सदस्याने कामकाजात व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने सभागृहात प्रवेश करावा.

Special Session of Parliament
Telangana Exit Poll 2023: तेलंगणाच्या एक्झिट पोलवर संपतापले मुख्यमंत्री KCR चे पुत्र, निवडणूक आयोगावर केला राग व्यक्त; पाहा VIDEO

>> सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल या प्रकारे सदस्यांनी आपापसात बोलू नये.

>> सदस्यांनी भाषण संपल्यानंतर लगेच सभागृहाबाहेर पडू नये.

>> विषय मांडण्यासाठी दिलेली नोटीस कोणत्याही सदस्याने मान्य होईपर्यंत प्रसिद्ध करू नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com