Devendra fadnavis News  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर;म्हणाले,' वन नेशन वन निवडणूक...'

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना निवडणुकीवरील विधानावरून जोरदार प्रत्युत्तर दिलं.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Devendra Fadnavis News : बोरिवली येथे आमदार सुनील राणे यांनी कुस्तीची दंगल आयोजित केली होती.उ पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या कुस्ती दंगल कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि इराणचा हुसेन रमजानी यांच्या कुस्ती झाली. यात पृथ्वीराज पाटील विजयी झाला याला चांदीची गदा देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गौरव केला. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांना निवडणुकीवरील विधानावरून जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता सर्व पक्षाचे नेते बनले आहेत. उद्धव ठाकरे असं काहीतरी बोलत असतात. संविधानांनानुसार एकत्र निवडणुका होत नाही. त्यांनी वन नेशन वन निवडणूक घेण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणावं. आता उद्धव ठाकरे यांना आता जैन समाज आणि उत्तर भारतीय यांची आठवण येत आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी मी उभा नाही, संविधानानुसार निवडणूक होतील'.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यांना फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'राज्यपाल कोश्यारी यांनी मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यांना महाविकास आघाडीने वादात टाकण्याचं काम केलं. कोश्यारी यांनी राज्यात चांगलं काम केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'राज्य सरकार कुस्तीला प्रोत्साहन देत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी यासारख्या मानाच्या कुस्ती जिंकलेल्या सर्व पैलवानांना आपल्या सरकारने तिप्पट रक्कम दिली आहे. तर अनेकांना आपल्या सरकारमध्ये नोकऱ्या देखील दिल्याचे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT