Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : जुही चावलाच्या मुंबईबदद्लच्या ट्वीटवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'सेलिब्रिटीने थोडासा...'

जुही चावलाच्या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयश्री मोरे

Devendra Fadnavis News : अभिनेत्री जुही चावलाने मुंबईवर केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे. जुहीने नुकतेच राज्याची राजधानी, ड्रिम सिटी असलेल्या मुंबईवर केलेल्या ट्वीटमुळे अभिनेत्री जुही चावला चर्चेत आली आहे. जुहीने सोशल मीडियावर मुंबईत पसरलेल्या दुर्गंधीविषयी भाष्य (Juhi Chawla Twitter Post) केले आहे. जुही चावलाच्या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आंतरराष्ट्रीय शहराला अशा प्रकारचं वक्तव्य एका सेलिब्रिटीने करताना थोडासा विचार करून बोलावं', असा सल्ला फडणवीसांनी चावलाला दिला.

कुर्ला छत्रपती शिवाजी महाराज तलाव या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी भव्य दिव्य अश्या छटपूजेचे आयोजन केले. या छटपूजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , आमदार आशिष शेलार उपस्थित होते. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने कुर्ला, साकीनाका, घाटकोपर , चेंबूर इत्यादी परिसरातून उत्तर भारतीय बांधव छट पूजेस उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुही चावलाच्या मुंबई बद्दलच्या वक्तव्यावर म्हणाले की, 'सार्वत्रिक बोलणं योग्य नाही. मुंबई एक उत्तम शहर आहे'.

'मुंबई शहरात इन्फ्रा स्ट्रक्चरची कमतरता आहे. महानगर पालिकेतल्या भ्रष्टाचारामुळे काही अडचणी लोकांना सहन करावे लागतात. मात्र आता सरकार बदललेलं आहे. मुंबईत आमच्या मुख्यमंत्र्यांनी सहा हजार काँक्रेट रस्ते बनवायला घेतले आहेत', असेही ते म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, 'मुंबई आता बदलणार आहे. त्यामुळे मुंबईला सरसकट बोलणं चुकीचं आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. आंतरराष्ट्रीय शहराला अशा प्रकारचं वक्तव्य एका सेलिब्रिटीने करताना थोडासा विचार करून बोलावं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT