Nana Patole: शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा, नाना पटोले राज्यपालांना भेटून करणार मागणी

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यपालांना भेटणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं.
nana patole
nana patole Saam TV

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर विरोधक नाराजी व्यक्त करत आहेत. राज्यात ED सरकारच्या शेतकरी (Farmer) विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. प्रकल्प बाहेर जात आहेत, बेरोजगारी वाढली आहे, यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहे, अशी माहिती नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकरी मदतीची अपेक्षा करत आहे. विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे. मात्र सरकारकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप विरोधक करत आहे. अद्याप पंचनामे देखील सुरु झाले नसल्याचा देखील आरोप होत आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यपालांना भेटणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

nana patole
Robert Vadra In Shirdi: भारत जोडो यात्रेच्या प्रभावाने लवकरच देशात बदल दिसेल: रॉबर्ट वाड्रा राहुल गांधींबाबत म्हणाले...

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं. संकटसमयी सरकारकडून कोणतीही मदत न मिळवल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.

nana patole
Robert Vadra In Shirdi: भारत जोडो यात्रेच्या प्रभावाने लवकरच देशात बदल दिसेल: रॉबर्ट वाड्रा राहुल गांधींबाबत म्हणाले...

राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या आत्महत्या वाढत आहेत. उद्योगांमुळे राज्यातील तरुणांना संधी मिळेल. राज्यातील प्रकल्प हे नेत्यांना खुश करण्यासाठी गुजरातला नेले जात असल्याचं ट्विट नाना पटोले यांनी केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com