devendra fadnavis and uddhav thackeray
devendra fadnavis and uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावरून नवा वाद; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना...'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

Devendra Fadnavis News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. तसेच संघाने ब्रिटिशांना मदत केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून ब्रिटिशांकडून स्टायपेंड (भत्ता) घ्यायचे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांची भूमिका मान्य आहे का? असा सवाल यावेळी फडणवीसांना केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांचा मी निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मागे भारताची जनता होती. अंदमानच्या काळ्या कोठडीत शिक्षा भोगणारे सावरकर हे स्वातंत्र्य सैनानी होते. भारतीय स्वातंत्र्य आणि त्यांची काव्य सावरकर लिहित होते. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यांचा इतिहास आणि काँग्रेसचा इतिहास माहित नाही'.

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं. 'उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की, राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? या विधानाचे समर्थन करणार का? सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली, असे विधान राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांची भूमिका मान्य आहे का? उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांची भूमिका मान्य आहे का? असा सवाल फडणवीसांनी ठाकरेंना केला.

'भारत जोडो यात्रेत प्रतिसाद मिळत नाही. मीडियामध्ये येण्यासाठी राहुल गांधी वक्तव्य करत आहेत, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

SCROLL FOR NEXT