मुंबई : शिवसेना (Shivsena) कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? यावरून सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. अशातच धनुष्यबाण चिन्हासंदर्भात तात्काळ सुनावणी का घेऊ नये? याबाबत ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाकडे ८०० पानांचं उत्तर सादर करण्यात आलं आहे. कागदपत्रांची तयारी कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी करण्याचे निमंत्रणही ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिले आहे. (Shivsena News Today)
मागील तीन दशकांहून शिवसेनेची निवडणुकीत ओळख असलेल्या धनुष्य बाण या निवडणूक चिन्हावरील दाव्याची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी दोन वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. दुपारी दोन वाजण्याच्या काही मिनिटे आधीच शिवसेनेने वकिलांमार्फत निवडणूक आयोगाकडे आपले उत्तर सादर केले आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक असल्यामुळे चिन्हाबाबत त्वरीत सुनावणी व्हावी, अशी विनंती एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर ठाकरेंनी आपले म्हणणे निवडणूक आयोगात सादर केले. एकनाथ शिंदे पोटनिवडणूकीत उमेदवार देणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. (Maharashtra News)
केवळ भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही ठाकरेंनी केलाय. केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून शिंदेंनी आयोगाला पत्र पाठवले शिवाय कागदपत्रांची तयारी कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी करण्याचे निमंत्रणही ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिले आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आज प्रत्यक्षात भेटून कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाहीत. तर एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचं सांगत आहे. त्यामुळं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.