dindoshi police arrests rohit kasare and denzel fernandes.
dindoshi police arrests rohit kasare and denzel fernandes. Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: गाेलमाल है भाई सब गाेलमाल है... फिल्म सिटी दाखविण्याचे बहाण्याने घडवली 'आरे' सफर, दाेघे अटकेत

साम न्यूज नेटवर्क

- संजय गडदे

Film City Studio in Goregaon : बाप नंबरी बेटा दस नंबरी या चित्रपटात कादर खान, शक्ती कपूर आणि असरानी यांच्या गोटया पोट्या कंपनीच्या माध्यमातून काही व्यक्तींना पैसे घेऊन दुबईला नेण्याच्या नावाखाली मुंबईतील मढ आयलँड बेटावर नेऊन सोडले. असाच काहीसा प्रकार मुंबई (mumbai) मधील फिल्म सिटी परिसरात देखील घडला आहे.

फिल्म सिटी पाहण्यासाठी आलेल्या विदेशी आणि परराज्यातील पाहुण्यांना फिल्म सिटीमध्ये न नेता त्यांना आरे जंगलची सैर घडवून आणली. याबाबत पर्यटकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाेंदवली आहे. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.

मुंबई मायानगरी आहे. या मायानगरीत चित्रपटात काम करण्याचे स्वप्न घेऊन अनेकजण इथे येतात. यात काही आपली स्वप्न पूर्ण देखील करतात. अशा अनेक चित्रपट कलाकारांना किंवा चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी पर्यटक मुंबई गाठतात. (Breaking Marathi News)

अनेकांना चित्रपट कलाकारांचे दर्शन होते तर काहींची फसवणूक देखील होते. अशीच फसवणूक विदेशातून आणि परराज्यातून आलेल्या पर्यटकांची झाली आहे. गुवाहाटी येथील व्यापारी फारूक फैजूर रहमान (Farooq Rehman) हे मुंबई दर्शन करण्यासाठी आले असता गुगलवर फिल्म सिटी आणि विविध चित्रपटाचे चित्रीकरणाचे स्पॉट सर्च केले असता त्यांना गोटया-पोट्या म्हणजे रोहित कासारे आणि डेन्झिल फर्नांडिस उर्फ ​​डेन्झो या दोघांचे नंबर आढळून आले.

या दोघांना त्यांनी संपर्क केला असता फिल्म सिटी पाहण्यासाठी साडेसहा हजार रुपये लागतील असे सांगतात होकार दर्शवला. या दाेघांनी त्यांना फिल्मसिटीच्या आत बांधलेल्या सेट आणि अनेक टीव्ही कलाकारांची ओळख करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर फिल्मसिटी पाहण्याच्या इराद्याने ते आले होते, मालिका आणि त्या पर्यटकांकडून दाेघांनी साडे हजार रुपये घेतले. (Maharashtra News)

पण बराच वेळ आरेच्या जंगलात फिरत राहिले आणि शेवटी त्याला फिल्मसिटीच्या गेटवर सोडून निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच फारुख रहेमान यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात (dindoshi police station) तक्रार दिली.

'फिल्म सिटी' दाखवण्याच्या बहाण्याने हजारो रुपये घेऊन परप्रांतीयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. रोहित कासारे (Rohit Kasare) आणि डेन्झिल फर्नांडिस उर्फ ​​डेन्झो (Denzel Fernandes) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दाेघांनी यापूर्वी अशी कुणाची फसवणूक केली आहे का याचा तपास आता दिंडोशी पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT