PM Narendra Modi in Mumbai Twitter/@ANI
मुंबई/पुणे

PM Narendra Modi in Mumbai : PM मोदी मुंबई दौऱ्यावर; कोणते रस्ते बंद आणि कोणते सुरू?, वाचा सविस्तर

Ruchika Jadhav

PM Narendra Modi in Mumbai : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण आज PM मोदींच्या हस्ते होत आहे. यासह 'अल जामिया' युनिव्हर्सिटीच्या उद्घाटनासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यामुळे रोजच्या गर्दीत आणि मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडू शकते. कारण मुंबईमधील वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत. (PM Narendra Modi in Mumbai Traffic Changes)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सकाळपासून मुंबईत तयारी सुरू आहे. तसचे पोलिसांचा फौज फाटा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर तैनात करण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन्ही ट्रेनला मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळे वाहतुकीत नेमका काय बदल झाला आहे हे जाणून घेऊ.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी कोणते रस्ते बंद करण्यात आलेत. तसेच पर्यायी कोणते मार्ग सुरू आहेत हे जाणून घ्या. सीएसएमटी प्लॅटफॉर्म 18 वर वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे पी डिमेलो रोड, ईस्टर्न फ्रीवे, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत या तिन्ही रस्त्यांवरील वाहतूक बदल करण्यात आलेत.

हे आहेत पर्यायी रस्ते

दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत सीएसटी स्थानकापासून ईस्टर्न फ्रीवे मार्गे गाड्या डीएन रोडने सर जेजे ब्रिजमार्गे पुढे सोडण्यात येत आहेत. तसेच दादर-माटुंगा, चेंबूर, इस्टर्न एक्सप्रेसवे मार्गाने काही वाहने सोडली जाणार आहेत. चर्चगेट स्थानकावरून चेंबूरकडे जाणारी वाहने ईस्टर्न फ्रीवे, वीर नरिमन रोड, सीटीओ जंक्शन, हजारी महाल सोमाणी, सीएसटी जंक्शन, दादर-माटुंगा रोड आणि सर जेजे फ्लायओव्हर या मार्गाने पुढे जाणार आहेत.

अंधेरी पूर्वेतील वाहतुकीतील बदल

अंधेरी पूर्व ते अल्जामिया आणि सोफिया मरोल कॅम्पस येथे बोहरा मुस्लिम समाजाकडून 'अल जामिया' युनिव्हर्सिटी उभारण्यात आली आहे. याचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे दुपारी 4.30 ते 6.30 या वेळेत पर्यायी मार्ग देण्यात आलेत. अंधेरी घाटकोपर कुर्ला रोडच्या दोन्ही बाजूची वाहतूक जशी आहे तशीच राहणार आहे.

मात्र साकीनाका जंक्शनकडून मरोळ नाक्याकडे येणार्‍या वाहनांचे मार्ग बदलले आहेत. साकीनाका जंक्शनवरून वाहने डावीकडे साकी विहार रोड मार्गे मिलिंद नगर, एल अँड टी गेट क्रमांक 8 च्या दिशेने जातील तसेच जेव्हीएलआर रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे वळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT