पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. आगामी निवडणूका लक्षात घेता मोदींचे मुंबईत एकापाठोपाठ एक दौरे सुरू आहेत. गेल्या महिन्यात देखील मोदी मुंबई दौऱ्यावर होते.त्यानंतर महिन्याभरातच आज त्यांचा आणखी एक दौरा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. (Latest PM Modi News)
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन मार्गांवर या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. तसेच अंधेरी येथे मरोळ परिसरात बोहरा मुस्लिम समाजाकडून 'अल जामिया' युनिव्हर्सिटी उभारण्यात आली आहे.याचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
कसा आहे PM नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा
मोदी दुपारी २.१० मिनिटांनी मुंबईच्या विमानतळावर पोहचतील.
दुपारी २.४५ मिनिटांनी पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचतील आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
दुपारी ३.५५ मिनिटांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पंतप्रधान मोदी मुंबईविमानतळाच्या दिशेने रवाना होणार आहेत.
दुपारी ४.२० मिनिटांनी मुंबई विमानतळावर पोहचतील.
दुपारी ४.३० अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन युनिव्हसीटीचे उद्घाटन करतील.
वाहतुकीत होणार बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे पश्चिम उपनगरातील आणि दक्षिण मुंबईत काही मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुंबईकरांची यामुळे काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते.मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा, रिगल जंक्शन, पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या वाहतुकीवर दुपारी २ ते ४ या वेळेत काही प्रमाणात परिणाम होणार आहे. तसेच, दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत थोडा बदल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.