Suicide Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: कर्जबाजारीपणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल; बायको-मुलांना विष देत स्वतः केली आत्महत्या

Mumbai Crime News: कर्जबाजारी झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या करत, स्वत:ही आत्महत्या केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: कर्जाचा डोंगर आणि आर्थिक चणचणीला कंटाळून एका ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या आपल्या परिवारासह जीवन संपवल्याची दुःखद घटना मुंबईतील (Mumbai) गोवंडी भागात घडली आहे. कर्जबाजारी (Bankrupt) झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या करत, स्वत:ही आत्महत्या केली आहे. मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी येथील ही दुर्देवी घटना समोर आली आहे. (Mumbai Suicide News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोवंडी येथील इंदीरानगर झोपडपट्टी भागात ही घटना घडली. शकिल जलील खान (३४), रजीया शकिल खान (२८), सर्फराज शकिल खान(५), आतिका शकिल खान(३) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. हे कुटुंब चाळ नं १३, फैजाने रजा मस्जीदचे मागे रोड नं १४, गोवंडी - मंबई येथे राहत होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कर्जबाजारी असलेल्या शकिलने २९ सप्टेंबरला शीतपेयातून आपल्या पत्नी आणि मुलांना विष दिले. हे शीतपेय प्यायल्यानंतर त्या सर्वांचा मृत्यू झाला. सर्वांचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर शकिलने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. कर्जाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT