Drunk And Drive Case Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News: खबरदार! दारू पिऊन वाहन चालवाल, तर खावी लागेल जेलची हवा

Drunk And Drive Case: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याला कल्याण न्यायालयाने ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि २० हजारांचा दंड ठोठावला आहे. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ट्राफिक पोलिसांनी २ वेळा दारू पिऊन वाहन चालवताना पकडले होते.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना यापुढे जेलची हवा खावी लागणार आहे. कल्याण न्यायालयाकडून एका मद्यधुंद दुचाकीचालकाला ३ महिन्यांचा कारावास आणि २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना यापुढे कठोर शिक्षा होणार आहे. दारू पिऊन वाहन चावणे हा दंडनीय अपराध आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाते. मद्यपान करण्यास मनाई नाही पण दारू पिऊन वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तींना यापुढे कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे. दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी डोंबिवलीतील ४० वर्षीय विनायक नाईक या व्यक्तीला कल्याण न्यायालयाने ३ महिन्यांचा साधा कारावास आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त १ महिन्याचा कारावास भोगावा लागेल.

विनायक नाईकला १ फेब्रुवारी आणि ८ एप्रिल २०२५ रोजी दोन वेळा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणात पोलिसांनी पकडले होते. पहिल्यावेळी त्याला १० हजारांचा दंड ठोठावला होता, आणि लायसन्स ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र दुसऱ्यांदा पकडले गेल्यावरही त्याने निलंबित लायसन्सवर वाहन चालवले ज्यामुळे त्याच्यावर पुन्हा १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

२ मे रोजी न्यायालयात त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर कल्याण न्यायालयाने तीन महिन्यांचा कारावास आणि २० हजारांचा अंतिम दंड सुनावला. डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी श्रीराम पाटील यांनी सांगितले की, जानेवारी २०२५ ते १२ मे २०२५ या कालावधीत एकूण ४६४ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तुलनेत मागील वर्षभरात ही संख्या फक्त १२६ होती.

ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि दारू पिऊन वाहन चालवणे टाळावे, अन्यथा यापुढेही अशी कठोर शिक्षा भोगावी लागू शकते, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

Kumbha Rashi: कुंभ राशीच्या व्यक्तींचा दिवस कसा असेल? प्रेमात खटके, पण समाजात मिळेल नवी ओळख; वाचा राशीभविष्य

Blouse Back Neck Design: ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे डिझाईन्स, तुमचा लूक दिसेल आकर्षक

SCROLL FOR NEXT