ओला चालकाची भाड्याच्या वादातून लोणावळ्यात हत्या चेतन इंगळे
मुंबई/पुणे

ओला चालकाची भाड्याच्या वादातून लोणावळ्यात हत्या

विरारमधील ओला कॅबचालक असलेल्या संतोष झा यांची लोणावळा येथे हत्या करून मृतदेह अमृतांजन ब्रीज जवळील दरीत फेकून देण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

मुंबई - विरारमधील Virar ओला कॅब Cab चालक असलेल्या संतोष झा (वय 45) यांची लोणावळा Lonavala येथे हत्या करून  मृतदेह अमृतांजन ब्रीज जवळील दरीत फेकून देण्यात आला होता. या हत्येचा उलगडा पोलिसांनी Police केला असून कर्नाटक निपाणी येथे भाड्याने घेऊन जात असलेल्या ओला कारमधील दोन प्रवाशांनी भाड्याच्या वादातून झा यांची हत्या Murder केल्याचे समोर आले आहे. driver killed in Lonavla over rent dispute

पोलिसांनी या प्रकरणी कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 13 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. ओला कारमधील जीपीएस प्रणालीमूळे या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे देखील पहा -

विरार येथील संतोष झा या ओला चालकाला १७ जून रोजी कांदिवली येथील यूसूफ अली चाऊस व मुस्तकीन चाऊस या सख्या भावांनी पनवेल  येथे जाण्यासाठी ओला कार बूक केली होती.त्यानंतर प्रवाशांना घेऊन संतोष झा निघून गेले होते.मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही  त्यांचाशी घरच्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांच्या मुलगा राहूल कूमार याने विरार पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दाखल केली होती. driver killed in Lonavla over rent dispute

विरार पोलीस ओला कारमधील जिपीएस प्रणालीद्वारे कारचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करीत होते.त्याच दिवशी संध्याकाळी संतोष झा यांची ओला कार कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ते गडहिंग्लज रोडवर एका गावाच्या हद्दीत बेवारस सापडल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली.या ओला कारच्या जिपीएस प्रणालीवरून सदर कार भाड्याने कांदिवली येथील चाऊस भावंडांनी बुक केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यानंतर संतोष झाच्या मिसिंग केसचा उलगडा झाला. 

यूसूफ अली चाऊस  व मुस्तकीन चाऊस या दोघांनी पनवेल येथे जाण्यासाठी सदर ओला कार भाड्याने घेतली होती. अगोदर पनवेल व मग लोणावळा पर्यंत ही कार या दोघांनी बुक केली होती .मात्र  लोणावळा येथे पोहचल्यावर आमृतांजन ब्रीज परिसरात या दोघांबरोबर ओला चालक संतोष झा याचे भाड्याच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर या दोघांनी संतोष यांची हत्या करून त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिला होता.या दोंन्ही आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वसई न्यायालयाने १३ जूलैपर्यंत या दोघांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Live : भाऊबि‍जेला कट रचला, मनोज जरांगेंनी वाल्मिक कराड, पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, नेमकं काय काय म्हणाले?

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

SCROLL FOR NEXT