DRDO Director Pradeep Kurulkar News Update  Saam Tv
मुंबई/पुणे

Pradeep Kurulkar News: प्रदीप कुरुलकर प्रकरणी मोठी अपडेट, एटीएस करणार व्हाईस लेअर टेस्ट?

Pradeep Kurulkar News Updates: प्रदीप कुरुलकर प्रकरणी मोठी अपडेट, एटीएस करणार व्हाईस लेअर टेस्ट?

साम टिव्ही ब्युरो

Pradeep Kurulkar Update News: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या (DRDO) पुणेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. एटीएस लवकरच कुरुलकर यांची व्हाईस लेअर टेस्ट करू शकते.

या टेस्टसाठी डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी नकार दिला आहे. असं असलं तरी एटीएसने कोर्टाकडे व्हाईस लेअर टेस्ट करण्याची परवानगी मागितली आहे. कोर्टाने एटीएसला परवानगी दिल्यास त्यांची ही टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्ट दरम्यान त्यांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती कोणाला सांगितली आहे की नाही? तसेच सांगितली आहे तर किती माहिती दिली आहे, अशा काही गोष्टी समोर येऊ शकतात.

कुरुलकर यांनी महिलेशी केलेले व्हॉटसअप चॅटिंग एटीएसच्या हाती

तत्पूर्वी, प्रदीप कुरुलकर यांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची बाब समोर आली आहे. या महिलेसोबतची त्यांची व्हॉटसअप चॅटिंग एटीएसच्या हाती लागली आहे. मात्र या महिलेने अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. संबंधित महिलेने तक्रार केल्यास कुरुलकर यांच्यावर आणि गुन्हे दाखल होऊ शकतात. (Latest Marathi News)

दरम्यान, हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याची माहिती समोर आली होती. त्यातून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानी हेरासोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटमध्ये त्यांनी अनेक भारतीय संरक्षण दलाची अनेक संवेदनशील माहिती दिल्याचे समोर आलं आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्तासोबत अनेक अॅपच्या माध्यमातून चॅटिंग केल्याचं समोर आलं आहे. याच प्रकरणी एटीएस तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan अनवाणी पायाने एअरपोर्टवर स्पॉट, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Viral Video: आजी जोमात बाकी कोमात, अस्सल डान्सरसोबत जुगलबंदी, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एकदम कडक!

Dhananjay Mahadik: 'लाडक्या बहि‍णी'बद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, आता स्पष्टीकरण, काय म्हणाले धनंजय महाडिक...

NeechBhang Rajyog: 12 महिन्यांनी तयार झाला नीचभंग राजयोग; चंद्र-मंगळ 'या' राशींना करणार मालामाल

Viral Vidoe : नाद करा पण काकांचा कुठे! चक्क डबल-डेकर सायकलवर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

SCROLL FOR NEXT