Coal Scam Delhi Special Court convicts Vijay Darda
Coal Scam Delhi Special Court convicts Vijay DardaSaam Tv

Vijay Darda Coal Scam: विजय दर्डा-देवेंद्र दर्डा पितापुत्रांना ४ वर्षांचा कारावास, दिल्ली विशेष न्यायालयाचा मोठा निकाल; काय आहे प्रकरण?

Coal Block Allocation : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह त्यांचा मुलाला दिल्ली विशेष न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे .
Published on

प्रमोद जगताप

Vijay Darda Convicted : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह त्यांचा मुलाला दिल्ली विशेष न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. दिल्ली विषेश न्यायालयाने कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांच्या मुलाला ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा विजय दर्डा यांना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने बुधवारी विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली. (Coal Block Allocation)

Coal Scam Delhi Special Court convicts Vijay Darda
PM Modi Prediction On 2023 : अविश्वास प्रस्तावाबाबत PM मोदींनी ४ वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली, VIDEO

दरम्यान, विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ४ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा या पिता-पुत्रांसहित यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Coal Scam Delhi Special Court convicts Vijay Darda
No-Confidence Motion: मोठी बातमी! मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यास लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

दरम्यान, कोळसा घोटाळा प्रकरणात कोर्टाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने विजय दर्डा आणि इतर लोकांना कलम १२० बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे. (Vijay Darda Coal Scam)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com