डॉ. योगेश आनंदराव पाटील यांना मानद डॉक्टरेट सन्मान
वीस वर्षात 12,000 पेक्षा अधिक कुटुंबांना आरोग्य सहाय्य
8,000 हून अधिक बालकांना हृदय शस्त्रक्रियेबाबत सहकार्य
संजय गडदे, साम टीव्ही
सामाजिक आरोग्य सेवा आणि नैसर्गिक चिकित्सा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्याची दखल घेत पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन-मथुरा येथेर्फे ‘विद्यावाचस्पति स्वरसत सम्मान’ (मानद डॉक्टरेट पदवी) मुंबईचे डॉ. योगेश आनंदराव पाटील यांना प्रदान करण्यात आली. वीस वर्षात बारा हजार पेक्षा अधिक कुटुंबांना आर्थिक साहाय्य करण्यासोबतच आठ हजार पेक्षा अधिक बालकांना हृदय शस्त्रक्रिया करण्यात आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल पाटील यांचा हा सन्मान करण्यात आला.
नवी दिल्लीतील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे झालेल्या भव्य समारंभात विद्यापीठाचे कुलपति डॉ. इन्दुभूषण मिश्रा, तसेच कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद्मश्री मा. डॉ. अरविंद कुमार (माजी कुलपति, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झाशी) यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. पाटील गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक आरोग्य सेवेत कार्यरत असून सध्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, अंधेरी (पश्चिम) येथील मेडिकल सोशल वर्क विभागात वरिष्ठ प्रबंधक म्हणून कार्य करतात. आतापर्यंत त्यांनी 12,000 पेक्षा अधिक कुटुंबांना आरोग्य सहाय्य, तसेच 8,000 हून अधिक बालकांना हृदय शस्त्रक्रियेबाबत मदत उपलब्ध करून दिली आहे.
कार्यक्रमाला विशिष्ट अतिथी म्हणून डॉ. विश्वनाथ पाणिग्रही (राष्ट्रीय पर्यावरणविद व वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, छत्तीसगड), तर मुख्य वक्ते म्हणून डॉ. ऋतु दुबे तिवारी (शिक्षणतज्ज्ञ व वरिष्ठ साहित्यिक, गाझियाबाद) उपस्थित होते. समारंभाचे संचालन आचार्य पं. जानकी वल्लभ, तर आभार प्रदर्शन संजय शर्मा यांनी केले.
सन्मान स्वीकारताना डॉ. योगेश पाटील यांनी विद्यापीठाचे कुलपति डॉ. मिश्रा, डॉ. पाणिग्रही आणि डॉ. विनोद ढोबळे (उपाध्यक्ष, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र) यांचे विशेष आभार मानले. तसेच सामाजिक आरोग्य सेवा, योग, नैसर्गिक चिकित्सा आणि योगिक शिक्षेचा प्रसार अधिकाधिक करणार असा संकल्प व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.