Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Mahaparinirvan Din 2022 : इंदू मिलचं काम लवकरच पूर्ण होईल; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदू मिलचे काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना (Dr. Babasaheb Ambedkar) अभिवादन केलं. यानंतर इथल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

इंदू मिलचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगाने सुरु आहे. आज राज्य सरकारच्या वतीने मी आश्वासन देतो की त्याचा देखील कार्यक्रम लवकरच होईल असे देखील ते म्हणाले.

'देशाची दिशा आणि दशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं'

आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा दिवस आहे. या देशाची दिशा आणि दशा बदलण्याच काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. देशातील प्रत्येक व्यक्तीला सामान अधिकार कोनमध्येही भेद करता येणार नाही असं संविधान त्यांनी दिलं. आज आमचा दिश प्रगती करत आहे करण लोकशाही जिवंत आहे. एक मार्ग एक संधी संविधानाने उपलब्ध करून दिली त्यांचे आभार माणण्या करिता आपण सगळे जमले आहोत.अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

चहावाला मुलगा पंतप्रधान होतो, हे घडवण्याचं काम संविधान करतं.

त्यांचा संदेश जगाच्या कल्यानाचा संदेश आहे. गौतम बुद्धाचे विचार प्रत्येक विचार संविधानिक मूल्य म्हणून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चहावाला मुलगा पंतप्रधान होतो, हे घडवण्याचं काम संविधान करतं. आपले पंतप्रधान म्हणतात, माझ्यासाठी संविधान हा एकच धर्मग्रंथ आहे, याने मी देश चालवेन. सर्वांच्या वतीने डॉ. आंबेडकरांना विनम्र आदरांजली", अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर व्यक्त केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT