नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
नवी मुंबई ते भिंवडीपर्यंत होणार डबल डेकर पूल
वरुन मेट्रो आणि खाली उड्डाणपूल
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण म्हणजेच एमएमआयडीए लवकरच भिवंडी ते कल्याण येथे डबल डेकर पूज बांधण्याच्या तयारीत आहे.हा पूल २१ किलोमीटरचा असणार आहे. भिवंडी रांजोळी जंक्शन आणि शिळफाटा जोडण्यासाठी डबल डेकर पूल बांधणार आहे. हा पूल कल्याणमार्गे जाणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गावरील वरील शिळफाटा येथून सुरु होईल. हा उड्डाणपूल डोंबिवली आणि कल्याणमधूल जाणार आहे. हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गावरील भिंवडीतील राांजोळी जंक्शन इथपर्यंत असणार आहे. हा उड्डाणपुल प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
डबल डेकर पूलची वैशिष्ट्ये
डबल डेकर उड्डाणपूल खालच्या डेकवर चार पदरी रस्ता असणार आहे तर वरच्या डेकवरुन मेट्रो रेल्वे ट्रॅक असणार आहे. यामध्ये भिंवडी ते कल्याणदरम्यान धावणारी मेट्रो ५, कल्याण ते तळोजा येथील मेट्रो १२ आणि काजुंरमार्ग बदलापूरदरम्यान धावणाऱ्या मेट्रो १४ चा समावेश असणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हा उड्डाणपूल ऐलरोली- कटाई फ्रीवे आणि विरार अलिबाग मल्डी मॉडेल कॉरिडोरसह जोडला जाणार आहे. वरच्या डेकवर मेट्रो लाइन असल्याने वाहतूक अधिक सुलभ होणार आहेत. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
बांधकामांमध्ये येणारी आव्हाने
कल्याणमधील कटाई नाका आणि पत्री पुलाच्या आधी दोन ठिकाणी उड्डाणपूल रेल्वे रुळांवरुन जाणार आहे. या मार्गावर स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या असणार आहत. यामुळे मध्ये रेल्वे मार्गावरील कामात अडचणी येऊ शकतात, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.