Dombivli  saam tv
मुंबई/पुणे

Dombivli : डोंबिवलीत मोठा राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, कारही फोडली; Video

Dombivli News : डोंबिवली गावदेवी शांताराम अर्कडजवळ शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या कारचीही तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Yash Shirke

  • ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांला मारहाण

  • मारेकऱ्यांनी कारचीही केली तोडफोड

  • डोंबिवलीमध्ये भयंकर घडलं

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dombivli City : डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीमधील गावदेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या कारची तोडफोड करण्यात आली. आरोपींनी भररस्त्यामध्ये राडा घातला. राडा करत कारची तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोड करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम गावदेवी परिसरातील शांताराम अर्कडजवळ धक्कादायक प्रकार घडला आहे. पैशांच्या दैवाण-घेवाणीवरुन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा त्याच्या कुटुंबीयांसह भररस्त्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

गावदेवी परिसरात झालेल्या हाणामारीमध्ये ठाकरे गटाचा पदाधिकारी सुजल म्हात्रे यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्यांनी सुजल यांच्या कारची तोडफोड देखील केली. मारहाण करणारे हे सुजल म्हात्रे यांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण, तोडफोड प्रकरणी सुजल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठाकरे गटाचे पदाधिकारी सुजल म्हात्रे यांच्या फिर्यादीवरुन विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या रोहन म्हात्रे, रोमेश म्हात्रे, रुचित म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही सख्खे भाऊ असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे विष्णुनगर पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT