Dombivli reel star Surendra Patil arrested along with two others in a 12-year-old kidnapping and murder case. saam tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीच्या रील स्टारचा आणखी एक कारनामा; 12 वर्षांनंतर उलगडला खून अन् अपहरणाचा प्रकार

Dombivli Reel Star Murder Case 2014 Details: डोंबिवलीतील रील स्टार सुरेंद्र पाटील याचा आणखी एक धक्कादायक गुन्हा उघड झाला आहे. २०१४ मधील अपहरण आणि खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखेने उलगडा करत तिघांना अटक केली आहे.

Omkar Sonawane

डोंबिवलीतील रिल स्टार सुरेंद्र पाटील याच्या घरात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात हत्यारआणि जिवंत काडतूस भेटल्याने मोठी खळबळ माजली होती. आता त्याचा आणखीन एक कारनामा उघड झाला आहे. तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण आणि खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासातून उलगडा केला आहे. या प्रकरणात सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळख असलेला सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा धक्कादायक कारनामा समोर आला असून, त्याच्यासह चंद्रकांत बाळाराम गायकर आणि सुरेश गोपाळ देगावत उर्फ छोटू या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील करण अरविंद बागुल या तरुणाचे २०१४ मध्ये अपहरण झाल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होती. मात्र, त्यावेळी या प्रकरणाचा उलगडा झाला नव्हता. दरम्यान, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास पुन्हा सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांची कसून चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात उघड झाले की, सात एकर जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी करण बागुल याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर दावडी येथील एका कार्यालयात नेऊन मुख्य आरोपी सुरेंद्र पाटील याने लोखंडी रॉडने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह कारमधून मुरबाड येथील बारवी धरण परिसरातील जंगलात नेऊन विल्हेवाट लावली.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्या काळात मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या नोंदींची पडताळणी केली. त्यावरून तो मृतदेह करण बागुल याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मूळ अपहरणाच्या गुन्ह्यात खून आणि पुरावे नष्ट केल्याची कलमे जोडण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, खूनासाठी वापरलेला लोखंडी रॉडही पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : काँग्रेसविरोधात भाजप महिला आघाडीचा कणकवलीत मोर्चा

Petrol-Diesel Price: टेन्शन वाढलं! कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

बच्चू कडूंच्या हाती 'धनुष्यबाण', कडूंच्या पक्षप्रवेशाचा शिंदेसेनेला फायदा काय?

Aambyachi Kheer Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्त घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंब्याची खीर, वाचा सोपी रेसिपी

धुरंधर ठरतोय दहशतवाद्यांचा कर्दनकाळ',टार्गेट किलिंग'नं पाकिस्तानात खळबळ

SCROLL FOR NEXT