Police action in Dombivli after allegations of forged documents, unauthorized construction and fraud in a housing project. saam tv
मुंबई/पुणे

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Shinde Group Shiv Sena Leader Arrested: डोंबिवलीतील कथित बेकायदेशीर बांधकाम आणि घर खरेदीदारांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह चौघांना अटक केली आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेची बनावट कागदपत्रे आणि अनधिकृत बांधकामाचे आरोप आहेत.

Bharat Jadhav

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

डोंबिवलीतील शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच शिंदे सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागाव येथील एका बेकायदा इमारतीतील सदनिका विक्रीच्या व्यवहारात नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोप आहे.

शिंदे शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख रामचंद्र गणपत माने ,महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्षमण मिसाळ यांच्यासह चौघांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली आहे .या प्रकरणामुळे डोंबिवलीतील राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी फिर्यादी बळीराम पांडुरंग जाधव (व्यवसाय – रिक्षाचालक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामचंद्र गणपत माने, रामदास टेकाळे, लक्ष्मण मिसाळ आणि मोहनलाल चौधरी यांच्याविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१४ मध्ये सागाव-नांदिवली येथील ‘नंदा निवास’ चाळीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रहिवाशांसमोर ठेवण्यात आला होता.

त्यावेळी संबंधित इमारतीला कल्याण-डोंबिवली महापालिकेची अधिकृत परवानगी असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक रहिवाशाला ३५० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, नंतर ३०० चौरस फुटांचे घर देण्यात येणार असून अधिक क्षेत्रफळासाठी स्वतंत्र रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वाढीव २६५ चौरस फुटांच्या बांधकामासाठी त्यांनी कर्ज काढून १५ लाख रुपये संबंधित विकासकांना दिले. मात्र नंतर संबंधित ‘यशवंत पार्क’ इमारत अनधिकृत असल्याचे समजल्याने त्यांनी बांधकाम परवानगीची पडताळणी केली.

त्यावेळी दाखविण्यात आलेली ऑगस्ट २००८ मधील जिल्हा परिषदेची बांधकाम परवानगी बनावट असल्याचे उघड झाल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.या तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बांधकामासाठी जिल्हा परिषदेची बनावट परवानगी, खोटे शिक्के आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून संबंधित इमारत अधिकृत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यामुळे आपली तसेच शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

दरम्यान, रामचंद्र माने यांनी यापूर्वी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. अलीकडेच त्यांच्यावर कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच लक्षमण मिसाळ हे बांधकाम कामगार क्षेत्रातील महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष आहेत .तक्रार दाखल झाल्यापासून हे चौघेही पसार झाले होते .अखेर मानपाडा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे .या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींच्या शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत अजितदादांच्या जयंतीचा समावेश

SCROLL FOR NEXT