KDMC Hospital: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर

KDMC Hospital Assault Case : डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकेवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती. आज कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ५०,००० रुपयांच्या रोख जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला.
KDMC Hospital Assault Case :
Shiv Sena corporator Ramesh Mhatre receives bail from Kalyan Court in connection with the alleged assault case involving medical staff at KDMC Shastrinagar Hospital.
Published On
Summary
  • कल्याण न्यायालयाने ₹50 हजारांच्या रोख मुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले.

  • रमेश म्हात्रे हे शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक आहेत.

  • न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी जामीन मंजुरीचा निर्णय दिला

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट)चे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. हा निर्णय न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी दिला.

KDMC Hospital Assault Case :
३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पण जात पंचायतीने १ लाखांत प्रकरण दाबले, अन् दारू पार्टी झोडली, चीड आणणारी घटना

या प्रकरणात रमेश म्हात्रे यांना यापूर्वी 14 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे वकील अॅड. गणेश पाटील, अॅड. मुजाहिद काझी आणि अॅड. आनंद पत्की यांनी कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सोमवारी न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी मंगळवारी घेण्यात आली. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करत, रमेश म्हात्रे यांना जामीन दिल्यास समाजात तेढ निर्माण होऊ शकते तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा युक्तिवाद केला आहे.

KDMC Hospital Assault Case :
Kalyan Pali Bus : कल्याण-डोंबिवली ते पाली एसटी बस सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा; वेळापत्रक जाणून घ्या

मात्र, बचाव पक्षाने रमेश म्हात्रे यांचे वय 73 वर्षे असून ते आजारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांच्यावरील अनेक जुन्या प्रकरणांत त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे सांगत, संबंधित दिवशी त्यांना रुग्णालयात बोलावण्यात आले होते आणि कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते तेथे गेले नव्हते, असा दावा करण्यात आला. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचेही बचाव पक्षाने नमूद केले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. अखेर सायंकाळी सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना 50 हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणातील इतर तीन आरोपींच्या जामिनासाठीही त्यांच्या वकिलांकडून लवकरच न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. मुजाहिद काझी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com