Rass Rang Dandiya canceled saam tv
मुंबई/पुणे

Navratri Update : डोंबिवलीतील सर्वात मोठा 'रासरंग दांडिया' उत्सव रद्द; निर्णय घेण्याचं कारण काय? वाचा

Dombivli Garba : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या दुःखात सहभागी होत यंदाचा डोंबिवलीतील प्रसिद्ध भव्य 'रासरंग दांडिया उत्सव' रद्द करण्याचा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे.

Saam Tv

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, कल्याण

महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले असून, राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होत यंदा डोंबिवलीतील भव्य रासरंग दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा मित्र मंडळाने घेतला आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी डोंबिवलीमध्ये रासरंग दांडिया उत्सवाचे उत्साहात आणि भव्य स्वरूपात आयोजन केले जाते. या उत्सवाला केवळ डोंबिवलीतूनच नव्हे, तर कल्याण, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि संपूर्ण परिसरातून हजारो नागरिक, विशेषतः तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. नवरात्रोत्सवातील या सांस्कृतिक सोहळ्याची उत्सुकता नागरिकांना वर्षभर असते. मात्र, यंदा राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव आयोजित न करण्याचा निर्णय आयोजकांनी जाहीर केला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकरी कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे. शेतकरी कुटुंबांना केवळ शेतीच्या नुकसानीतून सावरण्यासाठीच नव्हे, तर मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नासारख्या महत्त्वाच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांपर्यंत मदतीची गरज आहे.

या कठीण काळात शेतकरी कुटुंबे एकटी नाहीत, त्यांच्यासोबत समाजानेही उभे राहिले पाहिजे, असा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्याच भावनेतून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने यंदाचा रासरंग दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्सवापेक्षा माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची, हा संदेश देत शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रंगणारा डोंबिवलीतील रासरंग दांडिया उत्सव यंदा होणार नसल्याचे आयोजक आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाण्यात मोर्चा

माशी मारायला हातोडा वापरणार का? CJP आंदोलनावरून सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं

Garba Special Hairstyle: नवरात्रीत ट्रेडिशनल आऊटफिटवर करा 'या' ७ हेअरस्टाईल; गरबा लुक दिसेल सुंदर

PM Kisan Yojana : कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ४,००० रुपये? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!

SCROLL FOR NEXT