Kalyan dombivli House Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News : डोंबिवलीतील अनधिकृत ६५ इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा; कोर्टात नेमकं काय घडलं?

Dombivli News update : डोंबिवलीतील अनधिकृत ६५ इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टाने या नागरिकांना दिलासा दिला आहे.

Vishal Gangurde

डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारती प्रकरणाची कोर्टात सुनावणी

न्यायालयाकडून रहिवाशांना प्रकरणात पक्षकार म्हणून सामील करण्यास मंजुरी 

या निर्णयामुळे रहिवाशांना थेट बाजू मांडण्याचा मिळाला कायदेशीर हक्क

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीतील अनधिकृत ६५ बिल्डिंग प्रकरणात अखेर रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात झाली. या ६५ बिल्डिंगमधील रहिवाशांची देखील या प्रकरणात पक्षकार करा, ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे हा मोठा रहिवाशांसाठी दिलासादायक निर्णय मानला जात आहे.

रहिवाशांचे म्हणणं आहे की, फसवणूक झाली असूनही इतके दिवस त्यांना या प्रकरणात पक्षकार बनवले जात नव्हते. मात्र, हायकोर्टाने त्यांच्या मागणीवर शिक्कामोर्तब केला. त्यावेळी रहिवाशांना या केसमध्ये पक्षकार करण्याचे आदेश दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्याशी रहिवाशांचा फोनवर संवाद साधला. चव्हाण यांनी रहिवाशांना पूर्ण पाठींबा देत, या संघर्षात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले असल्याचे समजते.

रहिवाशांना आता कोर्टात आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार असल्यामुळे या निर्णयाने त्यांचा लढा अधिक बळकट झाला आहे. पुढील सुनावणीत हायकोर्ट त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील हा टप्पा रहिवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण-डोंबिवली महापालिकेने ६५ इमारतींना नोटीस धाडली होती. या इमारतीवर ऐन पावसाळ्यात हातोडा पडणार होता. त्यामुळे अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या लोकांवर बेघर होण्याची वेळ येणार होती. पालिकेच्या नोटीसमुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, हायकोर्टात इमारतीमधील ६५ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh lanke News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज; मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची प्रतिक्रिया

Team India Announcement: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; ODI सीरिजसाठी नव्या संघाची घोषणा

सकाळी नाश्ता करताना अस्वस्थ वाटलं, नंतर हृदयविकाराचा झटका; स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Kolhapur Politics: चाणक्यांमुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ-घाटगेंची युती घडवण्यात फडवणीसांचा हात

Maharashtra Live News Update: शिंदेसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT