DOMBIVLI BUILDING COLLAPSE: DANGEROUS STRUCTURE NEAR STATION CRASHES, NO CASUALTIES saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News: डोंबिवलीत मोठी दुर्घटना! स्टेशन परिसरातील धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; परिसरात खळबळ

Dangerous Building Collapse Near Dombivli Station: डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील सुमती निवास या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात असलेल्या सुमती निवास या अति धोकादायक इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही इमारत रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही इमारत अत्यंत धोकादायक असल्याने इमारत पावसाळ्यापूर्वीच पाडकामाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम शहरातील विविध भागांमध्ये दिसून येत आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत, रस्त्यांवर पाणी साचले आहे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, तर कल्याणजवळील टिटवाळा येथे रस्त्याला भगदाड पडल्याची घटना घडली. याशिवाय, कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या आरोग्य विभागाची संरक्षण भिंत एका सोसायटीवर कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अशातच डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील सुमिती निवास इमारतीचा काही भाग कोसळल्याने धोकादायक इमारतींच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. आता तरी महापालिकेने तातडीने या धोकादायक इमारतीवर पाडकामाची कारवाई करून भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काँग्रेसचे साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन, नालेसफाईवरील कोट्यवधींच्या खर्चाचा हिशेब द्या

कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. चौकात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करत कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा केला जातो, मात्र पावसात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने हा निधी नेमका गेला कुठे, असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला.जोपर्यंत रस्त्यावर साचलेले पाणी हटत नाही, तोपर्यंत युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू राहील आणि आम्ही पाण्यात बसूनच निषेध करू,असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT