Maharashtra Politics  saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: शिंदेगटाच्या नगरसेवकाची दादागिरी, महिला डॉक्टरसह ६ जणांना शिवीगाळ करत मारहाण

Maharashtra Politics: डोंबिवलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या नगरसेवकाने महिला डॉक्टरसह ६ जणांना शिवीगाळ करत मारहाण केली.

Priya More
  • डोंबिवलीतील केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयातील घटना

  • महिला डॉक्टर, २ डॉक्टर आणि ३ नर्सना शिवीगाळ करत मारहाण

  • शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दादागिरीचा आरोप

  • घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

शिवसेना शिंदेगटाच्या नगरसेवकाने महिला डॉक्टरसह ६ जणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदेसेनेच्या नगरसेवकाच्या दादागिरीप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. या नगरसेवकाने महिला डॉक्टर, तिचे २ सहकारी डॉक्टर आणि ३ महिला नर्ससोबत हे भयंकर कृत्य केले. डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगरनगर रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर हॉस्पिटलमधील नर्स आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि ३ महिला नर्सना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान सुरक्षारक्षकांना कार्यकर्त्यांनी पकडून ठेवल्याचाही आरोप आहे. घटना घडल्यानंतर रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर झाले. 'आमच्यावर किती अन्याय करणार', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून कामबंद आंदोलन सुरू केले. तसेच या प्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तपासणीनंतर बाळाला जन्मानंतर एनआयसीयू उपचारांची आवश्यकता भासू शकते, याची माहिती डॉक्टरांनी संबंधित कुटुंबीयांना दिली. मात्र, रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड भरले असल्याने संबंधित महिलेला अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर मारहाणीची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आधी देखील अनेकदा डॉक्टर आणि रुग्णालयामधील नर्ससोबत असे प्रकार होत राहिले आहे. डॉक्टरांची मनस्थिती काम करायची नाही आहे अशी भावना हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar : उल्हासनगर हादरलं! भरदिवसा तरुणाची हत्या; घटना कॅमेऱ्यात कैद

पावसाळ्यात खा गावरान शेवळा भाजी; चव अशी की बोटं चाटत राहाल!| Shevla Bhaji Recipe

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत; दोन्ही मार्ग खुले

Weight Loss: ओटीपोट सुटलंय तर घरच्या घरी करा हे 4 सोपे उपाय

महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप? शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार? भाजपच्या दिग्गज नेत्यासोबत तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT