Dombivli Crime x
मुंबई/पुणे

Dombivli Crime : डोंबिवलीत मोठा राडा! पगाराच्या मुद्द्यावरून चाकू हल्ला, रिक्षा युनियन लीडरवर सपासप वार

Dombivli : डोंबिवलीमधील नांदवली परिसरात मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हर यांच्या पगारावरुन वाद आला. त्यांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. दोघांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Yash Shirke

  • डोंबिवली नांदवली परिसरात चाकू हल्ला

  • मिनी व्हॅन मालक व ड्रायव्हर यांच्यात वाद

  • पगाराच्या वादातून एकमेकांवर वार

  • मालक हा रिक्षा युनियन लिडर

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dombivli News : डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व भागातील नांदवली परिसरात मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हर यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यामध्ये दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या नांदवली परिसरात चाकू हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये रिक्षा युनियन लीडर आणि मिनी व्हॅन ड्रायव्हर दोघेही जखमी झाले. दोघांनीही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तीन महिन्यांचा पगार न दिल्याच्या कारणावरून वाद झाल्याचे म्हटले जात आहे. ड्रायव्हरने आधी मालकावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर प्रत्युत्तरात मालकानेही ड्रायव्हरवर चाकूने वार केला. पगाराच्या वादातून दोघांमध्ये झालेल्या झटापटीत दोघेही गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काय-काय घडलं ते पाहायला मिळते.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला

डोंबिवलीमधील गावदेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला होता. हल्लेखोर हे त्याचेच नातेवाईक होते. त्यांनी पदाधिकाऱ्याला मारहाण केली. त्यासोबत त्याच्या कारची देखील तोडफोड केली. पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन मारहाण झाल्याचे पोलिसांनी म्हटले होते. पदाधिकाऱ्याने त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT