Police in Dombivli arrest youth after a college student files complaint alleging rape and blackmail following a three-year relationship. Saam Tv
मुंबई/पुणे

सोशल मीडियातून ओळख, ३ वर्षे प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्...; पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ

Dombivli College Girl Complaint Against Boyfriend: डोंबिवलीतील एका कॉलेज तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर अरमान शेख या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली. भिवंडी येथे लग्नाची तयारी सुरू असताना हिंदूवादी कार्यकर्ते पोहोचल्याने गोंधळ उडाला.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: अल्पवयीन असताना सोशल ऍप व्हिडिओच्या माध्यमातून मैत्री झाली. जवळपास 3 वर्षे प्रेमसंबंध होते. १८ वर्षे होताच लग्न करण्याचे ठरविले. लग्नासाठी काजी आणि साक्षीदार पोहचले. याचेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धडक दिली. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. अखेर या प्रकरणात अरमान शेख या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्साे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत तरुणीही डोंबिवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते.

डोंबिवलीत राहणारी एक तरुणी मध्यवर्गीय कुटुंबातील आहे. ती सध्या BA च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. ही तरुणी काल भिवंडी येथे गेले. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ती एका अरमान शेख नावाच्या तरुणासोबत लग्न करणार होती. अरमानने मुस्लिम पद्धतीने लग्न करण्यासाठी सगळी तयारी करुन ठेवली होती. काजी आणि साक्षीदार बोलाविले होते. त्याच वेळी हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले. हिंदू धर्माच्या मुलीशी लग्न करतो यावरुन प्रचंड गोंधळ झाला. हे प्रकरण शांतीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले.

हे प्रकरण डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याने शांतीनगर पोलिसांनी तरुण तरुणीला विष्णूनगर पोलिस ठाण्याकडे पाठविले. अखेर या प्रकरणात पीडीत तरुणीच्या तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख याच्या विरोधात ब्लॅकमेल करुन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, अरमानने आधी मैत्री केली. त्यानंतर शारीरीक संबंध ठेवले. ब्लॅकमेल करुन लग्नासाठी तगादा लावत होता. अरमान शेख याला पोलिसांनी अटक करुन पुढील तपास सुरु केला. अरमान हा व्यवसायाने टेलर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबप रोडवर भीषण आग, शेती आणि झाडांना मोठा फटका

Viral Video: वरातीत नाचताना आयफोन गटारात पडला; पठ्ठ्या थेट घाण पाण्यात उतरला; पाहा व्हिडिओ

Khana Saree Contrast Blouse: लग्नात खणाच्या साडीवर घाला ८ कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज; बजेटमध्ये करा स्टायलिश लूक

Share Market Closed: पुढच्या आठवड्यात फक्त ३ दिवस सुरु राहणार शेअर मार्केट;४ दिवस सुट्ट्या, कारण काय?

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT