Shreya Maskar
पळसे धबधबा ज्याला 'पळशे' धबधबा असेही म्हणतात. हा पुणे जिल्ह्यात ताम्हिणी घाटात, मुळशी धरणाजवळ वसलेला आहे.
पळसे धबधबा दोन टप्प्यांतून खाली कोसळणारा एक अतिशय सुंदर धबधबा आहे. पावसाळ्यात वीकेंडला तुम्ही येथे नक्की ट्रिप प्लान करू शकता.
पुण्यापासून साधारण ५० किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणापर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे आहे. मुख्य रस्त्यापासून केवळ ५ ते १० मिनिटे चालत जाऊन येथे पोहोचता येते.
पळसे धबधब्याच्या आजूबाजूच्या परिसरात पावसाळ्यात हिरवळ पाहायला मिळते. तसेच रस्त्याच्या कडेला गरमागरम मॅगी आणि भाजलेला मका हे खाद्य पदार्थ देणारे स्टॉल पाहायला मिळतात.
मुंबई टू पुणे ट्रेनचा प्रवास करा. पुढे रिक्षा किंवा एसटीने मुळशीला जा. तेथून काही अंतरावर पळसे धबधबा आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पळसे धबधब्याला भेट द्या. फॅमिली ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
पळसे धबधब्याजवळ मुळशी धरण , ताम्हिणी घाट, आंधारबन जंगल ट्रेक, देवकुंड धबधबा ही सुंदर ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.