Mumbai Beach : नारळाच्या झाडांनी वेढलेला मुंबईतील समुद्रकिनारा, 'हे' सिक्रेट ठिकाण खूप कमी लोकांना माहितेय

Shreya Maskar

पावसाळी ट्रिप

मुसळधार पावसात मित्रांसोबत पिकनिक प्लान करत असाल तर मुंबईतील मार्वे बीच बेस्ट ऑप्शन आहे.

Rainy trip | pinterest

मार्वे बीच-मालाड

मार्वे बीच मुंबई मालाड पश्चिम येथे वसलेला आहे. मालाड रेल्वे स्थानकापासून अंदाजे 5 किमी अंतरावर हा किनारा आहे. तुम्ही स्टेशनपासून रिक्षाने या बीचपर्यंत पोहचू शकता.

Beach | yandex

मार्वे बीच

मार्वे समुद्रकिनारा त्याच्या निसर्गरम्य पाम वृक्षांसाठी, सूर्यास्ताची अद्भुत दृश्ये आणि जवळच्या गोराई जेट्टीसाठी ओळखला जातो.

Marvey Beach | google

बोटिंगचा आनंद

मानोरी बेट आणि जवळच्या गोराई बीचपर्यंत परवडणाऱ्या 15 मिनिटांच्या फेरी राइडचा येथे आनंद घेता येतो. हे प्राथमिक जंपिंग पॉइंट आहे.

boating | pinterest

फोटोग्राफी

तुम्हाला समुद्रकिनारी फोटोशूट किंवा प्री वेडिंग शूट करायचे असेल तर मार्वे बीच बेस्ट लोकेशन आहे. येथे संध्याकाळी सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Photography | pinterest

मालाडमधील समुद्रकिनारे

अक्सा बीच, दानापाणी बीच, मढ बेट आणि बीच, मनोरी बीच हे सुंदर समुद्रकिनारे मलाडजवळ आहे.

Beaches in Malad | google

कधी भेट द्यावी?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला येथे जा. लहान मुलं वाळूमध्ये मस्त मजा करू शकतात.

When to visit? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : लोणावळा-खंडाळ्याच्या कुशीत वसलेला 'हा' निसर्गरम्य धबधबा, पावसाळ्यात पाहायलाच हवा

Pune Waterfalls | AI PHOTO
येथे क्लिक करा...