Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Today Weather Update News : राज्यातील मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून मुंबईसह अनेक भागांत जनजीवन सुरळीत होत आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
MAHARASHTRA RAIN UPDATE: ORANGE ALERT FOR PUNE AND SATARA AS HEAVY RAINFALL EASES ACROSS STATE
MAHARASHTRA RAIN UPDATE: ORANGE ALERT FOR PUNE AND SATARA AS HEAVY RAINFALL EASES ACROSS STATESaam Tv
Published On
Summary
  • राज्यातील मुसळधार पावसाचा जोर कमी झाला

  • पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट

  • मुंबईसह उपनगरांमध्ये जनजीवन आणि वाहतूक सेवा पूर्वपदावर

  • कोकण, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता कायम

Maharashtra Today Rain Update News राज्यात गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाने अखेर काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची तीव्रता ओसरल्याने दैनंदिन जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.आज पुणेसह सातारा जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित ठिकाणी पावसाची उघडीप कायम राहणार असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही भागांमध्ये अद्याप जोरदार सरी कोसळण्याची शक्यता कायम आहे. आज पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागांसाठी दक्षतेचा इशारा अर्थात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

MAHARASHTRA RAIN UPDATE: ORANGE ALERT FOR PUNE AND SATARA AS HEAVY RAINFALL EASES ACROSS STATE
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

मुंबईसह अनेक शहरांना यलो अलर्ट

याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिकच्या घाटमाथा भागात तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

MAHARASHTRA RAIN UPDATE: ORANGE ALERT FOR PUNE AND SATARA AS HEAVY RAINFALL EASES ACROSS STATE
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

मराठवाड्याला भूकंपाचे हादरे

मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान राज्यभरात पावसाची चिन्ह असून दुसरीकडे मराठवाडा आज सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com