Dombivli Blast News Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli Blast News : हातातली अंगठी पाहून पत्नीची ओळख पटली, डोंबिवलीमधील दुर्घटनेत काळजाला चिरणारा पतीचा आक्रोश

Dombivli Chemical Unit Blast : तिने सकाळी ऑफिसला निघताना ज्या रंगाचा ड्रेस घातला होता त्या रंगावरून आणि तिच्या दातांना लावलेल्या तारेवरून भावांनी आपल्या बहिणीची ओळख पटवली आहे.

Ruchika Jadhav

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची संख्या ६० च्या पुढे पोहचली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी रडून मोठा आक्रोश व्यक्त केला आहे. त्यातीलच एक अमित खानविलकर. अमित यांच्या पत्नीचा या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अमित यांच्या पत्नी रिद्धी खानविलकर (वय ३६) डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अमुदान कंपनीत अकाउंटचं काम करत होत्या. अंबर अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्फोट झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. अमित यांना ही माहिती समजताच त्यांच्या काळजाचही धस्स झालं. त्यांनी पत्नी पत्नीला खूप कॉल केले. मात्र फोनवर काही बातचीत झाली नाही.

कासावीस झालेल्या जीवाने त्यांनी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना याबाबत कळवले. घटनास्थळी धाव घेत आपल्या पत्नीची शोधाशोध सुरू केली. मात्र तिथे काहीच तपास लागत नव्हाता. त्यामुळे त्यांनी रिद्धी यांचे फोटो मित्रांना आणि विविध हॉस्पीटलच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवले. कुठे तरी आपल्या पत्नीची माहिती मिळेल या आशेने ते धडपडत होते.

काहीवेळाने अमित यांच्या मित्रांना एका डॉक्टरांचा फोन आला. मृतदेह ज्या हॉस्पीटलमध्ये आहेत तेथे एकदा तपासा असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी अमित यांनी तात्काळ तेथे धाव घेतली. तेव्हा त्यांच्यासमोर दोन महिलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत होते. चेहरापाहून मृतदेहाची ओळख पटवणे फार कठीण होते. मात्र अमित यांना त्यांच्या पत्नी रिद्धी यांची अंगठी दिसली. बोटातली अंगठी आपल्या पत्नीची असल्याचं समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

दोन महिलांमध्ये दुसरा मृतदेह रिद्धी यांच्यासोबत काम करणाऱ्या रोहिणी कदमचा (वय २६ ) होता. तिचा चुलत आणि सख्खा भाऊ रुग्णालयात आला होता. आपल्या बहिणीची ओळख पटवण्यासाठी आल्यावर चेहरा पाहून काहीच समजत नव्हते. मात्र तिने सकाळी ऑफिसला निघताना ज्या रंगाचा ड्रेस घातला होता त्या रंगावरून आणि तिच्या दातांना लावलेल्या तारेवरून भावांनी आपल्या बहिणीची ओळख पटवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT