Dombivli Saam
मुंबई/पुणे

Dombivli: 'बदनामीचा कट, बारवाल्याने उसने पैसे दिलेच नाही..'त्या' व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीने आरोप फेटाळले

Dombivli Bar Controversy: डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बारचालकांकडे पैसे मागताना आणि पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसत होता. त्याने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बारचालकांकडे पैसे मागताना आणि पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत होता. यावरून काही बारचालकांनी तो व्यक्ती त्यांच्याकडे जबरदस्तीने पैसे मागत असल्याचा आरोप केला, यानंतर त्याच्या विरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने पुढे येत त्याने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

मीच पीडित आहे

भगवान भुजंग असे त्या व्यक्तीचे नाव असून, त्याने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वत: पीडित असल्याचं सांगितलं. भगवान भुजंग यांनी सांगितले की, "मी गणेश नावाच्या बारचालकाला दोन वर्षांपूर्वी पैसे उसने दिले होते. मात्र, तो दीर्घकाळ मला पैसे परत करत नव्हता. त्यामुळे मी त्याच्याकडे महिन्याला २० हजार रुपये हप्ता स्वरूपात पैसे मागितले", असे त्याने सांगितलं.

तसेच, "हे पैसे मागितल्याचा राग मनात धरूनच माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. व्हिडिओ एडिट करून, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे." असा आरोप त्याने केला आहे.

बारमध्ये गैरकृत्यांचा आरोप

भुजंग यांनी आरोप केला की, "येथील बारमध्ये अनेक गैरकृत्ये सुरू आहेत. बारची परवाने संपले असून, अनधिकृतपणे व्यवसाय सुरू आहे. याबाबत मी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत आणि त्यानंतर कारवाईही झाली होती."

त्यांनी स्पष्ट केलं की, "हेच प्रकरण डोळ्यासमोर ठेवून मला अडचणीत आणण्यासाठी आणि माझ्या सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे." असे भुजंग म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि दोन्ही बाजूंकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT