Dombivli News  Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत

Dombivli News : आसनगाव-वाशिद रेल्वे स्थानकादरम्यान एका विद्यार्थिनीचा मृतदेह रेल्वेच्या ट्रकजवळ आढळल्याची माहिती समोर आली आहे. ही विद्यार्थिनी डोंबिवलीच्या एका शाळेत दहावीत शिकत होती. परीक्षेच्या आधी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

आसनगाव स्थानकाजवळ रेल्वेच्या रुळाशेजारी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही अल्पवयीन मुलगी डोंबिवलीच्या भोपर परिसरात राहत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ट्रेनमधून पडून या मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव आकांक्षा जगताप असे आहे. १६ वर्षीय आकांक्षा डोंबिवलीतल्या एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. २२ फेब्रुवारीला तिचा पहिला पेपर होता. दहावीची परिक्षा सुरु होण्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांना आसनगाव-वाशिंद या स्थानकांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळाशेजारी आढळला.

डोबिंवलीच्या भोपर परिसरात ही मुलगी कुटुंबासह राहत होती. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी आकांक्षा आईवडिलांसह मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. संध्याकाळी ते सर्वजण डोंबिवलीलाl परतले. त्याचदरम्यान आकांक्षा अचानक गायब झाली. तिच्या आईवडिलांनी शोधाशोध करुनही ती सापडली नाही.

त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आसनगाव आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेरुळाशेजारी एका मुलीचा मृतदेह आढळला. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली. पुढे तपासादरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांना आकांक्षाची ओळख पटली.

आकांक्षा डोंबिवली रेल्वे स्थानकात उरतली. मात्र त्यानंतर तिने रेल्वे स्थानकावरुन आसनगावला जाण्यासाठीची ट्रेन पकडली आणि ती आसनगावच्या दिशेने निघाली. तेव्हा ट्रेनमधून पडून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पण ती आसनगावच्या ट्रेनमध्ये का बसली, तिचा अपघात झाला की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Rajgad Travel: मुंबईपासून राजगड किल्ल्यापर्यंत प्रवास कसा करावा? ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Maharashtra Rain: परतीच्या पावसाचा हाहाकार! आज पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT