Sanjay Raut On Dombivali Illegal Buildings Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivali News: साडेसहा हजार कुटुंबांची जबाबदारी सरकार घेणार का? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut On Dombivali Illegal 65 Buildings: बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळ मिळून शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. ६५०० कुटुंब एका क्षणात रस्त्यावर येणार आहेत, त्याची वेदना सरकारला होत नाही का, असा सवालर संजय राऊत यांनी केलाय.

Bharat Jadhav

जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सांगतात. मग डोंबिवलीमधील अनधिकृत इमारतीमधील साडेसहा हजार कुटुंब रस्त्यावर येणार आहेत, त्यांची जबाबदारी कोणतं सरकार घेणार,असा सवाल संजय राऊतांनी केलाय. डोबिंवलीमधील ६५ इमारती अनधिकृत ठरवल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकावर टीकास्त्र सोडलंय.

डोंबिवलीतील सुमारे साडेसहा हजार कुटुंब येत्या काही दिवसांत बेघर होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील ६५ इमारती जमीनदोस्त होणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या ६५ इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्यात. त्यांच्या महापालिकेचा बुलडोझर फिरणार आहे. यामुळे या इमारतीमध्ये राहणारी साडेसहा हजार कुटुंब रस्त्यावर येणार आहेत.

यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलंय. त्या भागाचे आमदार रविंद्र चव्हाण असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत केलीय. हे सरकार जनतेच्या भावनेतून आलेलं आहे, असं फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे सांगतात. दुसरीकडे डोंबिवलीमध्ये ६२ इमारतींवर बुलडोझर चालवला. यात किमान साडेसहा ते सात हजार कुटुंब रस्त्यावर आलेत, याची जबाबदारी कोणतं सरकार घेणार? ६५०० कुटुंब एका क्षणात रस्त्यावर येत आहेत, त्याची वेदना सरकारला होत नाही का, असा सवाल राऊतांनी केलाय.

येथील बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळ मिळवत, शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. या घरांवर नागरिकांना कर्ज मिळाले आहेत, असंही राऊत म्हणालेत. गौतम अदानी त्याच्या प्रकल्पासाठी इतके मेहनत केली जाते तर या सरकारने डोंबिवलीच्या साडेसहा हजार लोकांवर मेहरबानी केली असती तरी लोक बेघर झाली नसती, असेही राऊत म्हणालेत.

आमदार रविंद्र चव्हाण लोकांना भेटेना

डोबिंवलीमधील ज्या भागात इमारती आहेत, त्या भागाचे आमदार रविंद्र चव्हाण आहेत. रविंद्र चव्हाण पळून जात आहेत, लोकांना भेटी देत नाहीत हा काय प्रकार आहे. ६५०० हजार घरांच्या प्रकरणांमध्ये कोण राजीनामा घेणार? रविंद्र चव्हाण या भागामध्ये अनेक वर्ष आमदार आहेत ते राजीनामा देणार का? तिथले सत्ताधारी मंत्री पालकमंत्री ते राजीनामा देणार का? त्या भागाचे खासदार कोण आहेत ते राजीनामा देणार का? असे सवाल संजय राऊत यांनी केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT