Dombivli NewsCrime News Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News: खळबळजनक! शिक्षिकेची २५ ते ३० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; संतप्त पालकांचा शाळेला घेराव

Dombivli Latest News: शिक्षिकेने 20 ते 25 मुलांना लाकडी पट्टी ,स्टीलच्या पट्टीने हाताने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी

Dombivli News:

डोंबिवलीच्या जोंधळे विद्यामंदिर शाळेत एका शिक्षिकेने 20 ते 25 मुंलाना लाकडी पट्टी, स्टीलच्या पट्टीने हाताने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत काही मुले जखमी झाले असून संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पश्चिमेकडील (Dombivli) प्रसिद्ध असलेल्या एस एच जोंधळे विद्यामंदिर शाळेत निर्दयी शिक्षिकेने मुलांना बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. निलम भारमळ असे या शिक्षिकेचे नाव असून त्यांनी पाचवी सहावीमध्ये शिकणाऱ्या 20 ते 25 विद्यार्थ्यांना लाकडी, स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली .

या मारहाणीत काही मुले जखमी झाली असून त्यांच्या अंगावरही मारहाणीचे वळ उठले आहेत. विशेष म्हणजे निलम भारदळ या तीन ते चार दिवसांपूर्वीच या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षिका नीट शिकवत नसल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी पालकांनी शाळेकडे केली होती. याचाच राग मनात धरून विद्यार्थ्यांना मारल्याचा आरोप पालकांनी केला असून याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचाही इशारा पालकांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी शाळा प्रशासनाने "आम्ही पालकांची माफी मागतो, पुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेऊ, संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: पुण्यात अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT