Dombivali Crime News saam tv
मुंबई/पुणे

Dombivali News : धूलिवंदनाच्या दिवशी क्षुल्लक वाद, टोळीकडून दोन तरुणांना बेदम मारहाण, डोक्यावर फोडल्या बियरच्या बाटल्या

Dombivali Crime : या प्राणघातक हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chandrakant Jagtap

>>अभिजीत देशमुख

Dombivali Crime News : राज्यात सर्वत्र धूलिवंदनाचा उत्साह असताना डोंबिवलीत एका टोळीने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहटे. डोंबिवलीत सायंकाळी क्षुल्लक वादातून तरुणांच्या टोळीने दोन तरुणांना बेदम मारहाण करत डोक्यावर बियरच्या बाटल्या फोडल्या.

या प्राणघातक हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओमकार माळी आणि अभिषेक भोईर अशी जखमी तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी विष्णू नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार माळी आणि अभिषेक भोईर हे दोन्ही तरुण डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात राहतात. सायंकाळच्या सुमारास हे दोघे सातपूल परिसरातून जात होते. त्यावेळी तेथे काही तरुण दारू पीत बसले होते. या तरुणांनी या दोघांना शिवीगाळ केली. (Latest Marathi News)

ओमकार आणि अभिषेकने त्यांना शिवीगाळ करू नका असे सांगताच तेथील तरुणांच्या टोळीने त्यांना लाथा बुक्क्याने बेदम मारण करण्यास सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी दोघांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या.

या हल्ल्यात दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही तरुणांची टोळी परिसरात दहशत पसरवत असते अशी माहिती आहे. दहशत पसरवण्याच्या उद्देशानेच त्यांनी हल्ला केल्याचे देखील बोलले जातेय. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे. (Dombivali News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT