डोंबिवलीत मनसेने खड्ड्यात बसून केले आंदोलन... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवलीत मनसेने खड्ड्यात बसून केले आंदोलन...

प्रदीप भणगे

डोंबिवली : यंदाच्या पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येते आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यात यावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून नागरिक तसेच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अखेर आज मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आणि डोंबिवली शहरातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलनाला सुरवात केली. पहिले मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि नंतर खड्ड्यात बसून हाय हाय नारा देत सत्ताधारी, प्रशासन आणि केडीएमसी अधिकारी यांचा निषेध व्यक्त केला. (Dombivali MNS agitation sitting in the pit)

हे देखील पहा -

यावर्षी बाप्पाचे आगमन खड्ड्यातून???

गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही डोंबिवली शहरात आणि 27 गावात पालिका प्रशासनाला खड्डे बुजविणे अद्यापही शक्य झालेले नाही आहे. डोंबिवली शहरातील टिळक रोड, जोशी शाळेचा रस्ता, सारस्वत कॉलनी रस्ता, घरडा सर्कल, डोंबिवली पश्चिम आणि 27 गावात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव आगमन खड्डय़ांतून काढण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. महापालिका मध्ये प्रशासकीय राजवट चालू आहे,मात्र आयुक्तांनी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसते. राजकीय मंडळी आणि सत्ताधारी शिवसेनेचे सुद्धा खड्ड्याबाबतीत मौन पाळले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने या वर्षीही गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहे. तसेच नियमांचे पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या निर्बंधांविषयी गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी असली तरी गणेशोत्सवासाठी मंडळांनी तयारी सुरू केली आहे. डोंबिवली शहरात आणि 27 गावांत घरगुती गणपतींचे आगमनही मोठ्या प्रमाणात होत असते.

खड्ड्यांमुळे शहरात ट्रॅफिक जाम शुद्ध होऊ लागेल आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही महापालिकेकडून खड्डे बुजविण्यात आलेले नाही.त्यामुळे महापालिका प्रशासन हे खड्डे कधी बुजवणार असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि नंतर खड्ड्यात बसून हाय हाय नारा देत सत्ताधारी, प्रशासन आणि केडीएमसी अधिकारी यांचा निषेध व्यक्त केला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT