अहमदनगर : आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात कामाचा धडाका लावला आहे. दोन्ही तालु्क्यातील लोकांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत. नदी पुनर्जीवन, पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही तालुक्यात मिरजगाव आणि खर्डा येथे स्वतंत्र पोलिस ठाणी मंजूर करून आणली आहेत. कर्जतचा पाणीप्रश्न सुटला आहे. आता जामखेडसाठी त्यांनी सुमारे १३८ कोटी रूपये मंजूर करून आणले आहेत.
राज्य सरकारने या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानातून पाणीयोजनेचे काम होणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यास जामखेडचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल. जामखेड शहराला आता भुतवडा तलावातून पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात जामखेडकरांचे हाल होतात. माजी मंत्री कै. आबासाहेब निंबाळकर यांनी ही योजना राबवली होती.Rohit Pawar brings Rs 150 crore for Jamkhed water project abn79
युती सरकारच्या काळातही ही योजना सूचविण्यात आली होती. मात्र, त्यात अनेक त्रुटी होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार पवार यांनी नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून घेतला. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली. आमदार पवार यांनी या वाढीव प्रकल्पास तांत्रिक आणि नंतर मार्च २०२०मध्ये १०६.९९ कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळविली. मात्र, डीएसआरच्या दरात बदल झाल्यामुळे या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार पवार यांनी जामखेड पाणीपुरवठा योजनेसाठी १३८ कोटी ८४ लाखांच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली. येत्या दोन वर्षांत ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा, अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. Rohit Pawar brings Rs 150 crore for Jamkhed water project abn79
निवडणूक काळातच जामखेडच्या पाणीप्रश्नाची भीषणता लक्षात आली होती. हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही येथील भगिनींनी माझ्याकडे केली होती. त्याची शब्दपूर्ती करताना समाधान वाटत आहे. शहरातील कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही आणि योजना वेळेत पूर्ण करण्यात येईल.
- रोहित पवार, आमदार
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.