डोंबिवली: उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ८ गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत लाखोंचा माल जप्त... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवली: उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ८ गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत लाखोंचा माल जप्त...

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गावठी दारू निर्मितीवर पायबंद घालण्यासाठी राज्या उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंम्बरच्या पार्श्वभूमीवर गावठी दारू निर्मिती विरोधात धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) डोंबिवली विभागीय कार्यालयाने गत बारा दिवसात धडक कारवाई करीत देसाई व आगासन खाडीत सुरू असलेल्या आठ गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त (Destroyed) केल्या. या कारवाईत गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे ३५ हजार लिटर रसायन व १४० लिटर गावठी दारू (Village liquor) व दारू बनण्याचे साहित्य असा सुमारे पावणे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती डोंबिवली (Dombivali) विभागीय कार्यालयाचे वरीष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी दिली. (Dombivali: Major action of excise department, demolition of 8 village distilleries and confiscation of goods worth lakhs)

हे देखील पहा -

थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या दारूला मोठी मागणी असते. या मध्ये देशी विदेशी बरोबरच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी गावठी दारूची ही मागणी मोठया प्रमाणात आल्याने या कालावधीत चोरी छुपे पणे गावठी दारूची निर्मिती केली जात असते. त्यातून काही वर्षांपूर्वी विषारी गावठी दारू पिऊन शेकडो मद्यापींना आपला जीव गमवावा लागला असल्याने गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गावठी दारू निर्मितीवर पायबंद घालण्यासाठी राज्या उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय आयुक्त सुनील चव्हाण व ठाणे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार दुय्यम निरीक्षक विश्वजित आभाळे, दुय्यम निरीक्षक मल्हारी होळे, जवान देवकाते, प्रीती पाटील, अमृता नगरकर आदी स्टाफ जीवाची भीती न बाळगता खाडीत उतरून मारलेल्या धाडीत सहभागी झाले होते.

त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे कि जर तुम्हाला दमन दारू, गोवा दारू किवा गावठी दारूची निर्मिती किवा विक्रीची माहिती असेल तर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी. यामुळे विषारी दारूपासून बळी जाणाऱ्या नागरिकांचे आपण प्राण वाचवू शकतो, असंही ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

Vidhan Sabha Election Result : कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; मतदारसंघातून अमल महाडिकांचा विजय निश्चित

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना मोठा धक्का; चंद्रकांत पाटील आघाडीवर

SCROLL FOR NEXT