Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का! नवी मुंबईतील दोन बड्या नेत्यांसह शेकडो शिवसैनिकांचा जय महाराष्ट्र

Shinde V/s Thackeray: ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असून, त्यांच्यासोबत माजी नगरसेवक देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत.

Bhagyashree Kamble

स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी नेत्यांनी कंबर कसलीय. लवकरच या निवडणुका होणार असून, राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केलीय. अनेक पक्षात राजकीय खलबतं सुरू होत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असून, त्यांच्यासोबत माजी नगरसेवक देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत.

आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर शिवसेना ठाकरे गट पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. द्वारकानाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवक देखील पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणूकीत शिवसेना ठाकरे गटानं तिकीट नाकारल्यानं भोईर यांनी राजीनामा दिला होता. द्वारकानाथ भोईर हे ऐरोलीचे जिल्ह्याध्यक्ष होते. मात्र, विधानसभा निवडणूकीत तिकीट नाकारल्यानं भोईर नाराज होते अशी चर्चा आहे. अशातच आगामी महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर द्वारकानाथ भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केला आहे.

जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवक देखील शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. तसेच सर्व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील आनंद आश्रमात दुपारी जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

SCROLL FOR NEXT