mahavikas Aghadi  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन मतभेद?; उद्धव ठाकरेंच्या दोन निर्णयांवरुन वादाची शक्यता

प्रविण वाकचौरे

सुनील काळे | मुंबई

Mumbai News :

महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन मतभेद होताना दिसत आहेत. जागावाटपाच्या बैठकांवर बैठक होत आहेत, मात्र अजून जागांचा तिढा सुटताना दिसत नाही. अशात उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत नाराजी असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.

सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटकडून उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार परस्पर जाहीर केले आहेत. जागावाटप एकत्रित जाहीर करण्याचं ठरलं असताना उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा दबावाचा भाग असल्याचं काँग्रेस नेत्याचे मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल किर्तीकर

महाविकास आघाडीत एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरु असताना शनिवारी (९ मार्च) अमोल किर्तीकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर सध्या शिंदे गटात असून विद्यमान खासदार आहेत.

चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी

तर सोमवारी उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. चंद्रहार पाटील यांनी कालच ठाकरे गटात प्रवेश केला. चंद्रहार पाटील यांना आपल्याला दिल्लीला पाठवायचे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनीं चंद्रहार पाटील यांची एकप्रकारे उमेदवारी जाहीर केली आहे.

दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगली या दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा आहे. उत्तर पश्चिम मुंबईच काँग्रेसचे संजय निरुपम लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर सांगलीतून विशाल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या दोन जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम जागावाटपात नेमकं काय ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakhpati Didi Scheme : खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

Kasara Ghat Accident : कसारा घाटात भीषण अपघात, भरधाव कंटेनरची ४ वाहनांना धडक; थरारक VIDEO

Shani Margi 2024: दिवाळीनंतर शनीच्या स्थितीत होणार बदल; संपत्ती वाढीसह या राशींना मिळणार अफाट पैसा

Monsoon Rain Alert : राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सुरु होणार, आज या जिल्ह्यांना झोडपणार; वाचा वेदर रिपोर्ट

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती स्वभावाने असतात तापट; एका घावातच संकटाचे करतात दोन तुकडे

SCROLL FOR NEXT