rasta roko at loni kalbhor toll naka for dhangar reservation saam tv
मुंबई/पुणे

Dhangar Reservation : 'आज रस्त्यावर मेंढ्या सोडल्यात उद्या मंत्रालयात सोडू'; धनगर आरक्षणासाठी लाेणी काळभाेर टाेल नाक्यावर आंदाेलन

पुढील काळामध्ये सरकार विरोधात मोठ्या आंदोलन उभे केला जाईल असा इशारा घनश्याम हाके यांनी दिला.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News : धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी लोणी काळभोर टोल नाक्यावर आज (शनिवार) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदाेलकांनी रस्त्यावरती मेंढ्या सोडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले हाेते. (Maharashtra News)

धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी आहे. सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. पुढील काळामध्ये सरकार विरोधात मोठ्या आंदोलन उभे केला जाईल असा इशारा घनश्याम हाके यांनी दिला.

आज रस्त्यावरती मेंढ्या सोडल्यात पुढील काळात मंत्रालयात न सांगता मेंढ्या सोडल्या जातील. फडणवीस सरकारने आरक्षण देतो म्हणून आमची फसवणूक केली व धनगर समाजातील नेत्यांनीही समाजाची दिशाभूल केली असल्याची टीका हाके यांनी केली. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून सर्टिफिकेट त्वरित द्यावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर महावतार नरसिंहाने मारली बाजी; 'सैयारा', 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'चा गेम ओव्हर

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT