Rohit Pawar Allegation On Devendra Fadanvis OSD  Saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar: देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींचा परदेश दौऱ्याचा खर्च कुणी केला? रोहित पवारांच्या आरोपांना कौस्तुभ धवसे यांचे स्पष्टीकरण

Rohit Pawar Allegation On Devendra Fadanvis OSD : कौस्तुभ धवसे यांना त्यांच्याशी संबंधित नसलेल्या परदेश दौऱ्यावर कशासाठी घेऊन गेले होते, असा आरोप रोहित पवारांनी केला होता. रोहित पवारांच्या आरोपांवर कौस्तुभ धवसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, मुंबई

Rohit Pawar News:

राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडी कौस्तुक धवसे यांच्यावर अनेक आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनी परदेश दौऱ्यावर ३ दिवसांत १.८८ कोटी खर्च केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे यांना त्यांच्याशी संबंधित नसलेल्या परदेश दौऱ्यावर कशासाठी घेऊन गेले होते, असा आरोप रोहित पवारांनी केला होता. रोहित पवारांच्या आरोपांवर कौस्तुभ धवसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

कौस्तुभ धवसे यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

तायवान दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे तेथे का गेले? 3 दिवसांच्या दौर्‍यावर 1.88 कोटी खर्च कसा काय झाला?

उत्तर : तायवानचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा होता. या दौर्‍यानिमित्त उद्योग विभागानं याचे संपूर्ण नियोजन केलं होतं. प्रारंभिक पातळीवर हा राजकीय दौरा ठरला होता. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना सध्या तायवान दौरे हे राजकीय नेत्यांऐवजी अधिकारी पातळीवर करावेत, असे निर्देश दिले होते. काही राज्यांनी तर त्या देशांनी उद्योग संपर्कासाठी कार्यालयेही उघडली आहेत. त्यामुळे हा दौरा अधिकार्‍यांनीच करावा, असेही ठरले आणि तसे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

या दौर्‍यात कोणत्या श्रेणीतील अधिकार्‍याचे कोणत्या श्रेणीचे तिकिट काढावे, तसेच भत्ते किती द्यावे, यासंबंधी शासनाचा याबाबत स्पष्ट जीआर आहे. या जीआरनुसारच तिकिटं काढण्यात येतात. एखादा अधिकारी आपले तिकिट अपग्रेड करत असेल तर अतिरिक्त खर्च संबंधित अधिकारी करीत असतो. संबंधित ट्रॅव्हल्स कंपनी संपूर्ण बिल विभागाला सादर करते. त्यानंतर संबंधित फरकाच्या रकमेची क्रेडिट नोट जारी करण्यात येते. तितका पैसा संबंधित अधिकारी थेट एजन्सीला देत असतो. त्यामुळे हा संपूर्ण खर्च विभागाने केला, असे म्हणण्यात अर्थ नाही.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोप 2 : देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौर्‍याचा खर्च जपानने केलेला नाही, तर तो एमआयडीसीने केला.

उत्तर : देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्‍यात शासकीय अतिथी म्हणून गेले होते. त्यामुळे त्यांचा खर्च हा जपान सरकारने केला होता. याची माहिती सविस्तरपणे माहिती अधिकारात सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या शासकीय अधिकार्‍यांचा खर्च हा एमआयडीसीने केलेला आहे. कारण, हा विविध कंपन्यांसोबत भेटण्यासाठीचा दौरा होता. फक्त पीएचडीचा दौरा नव्हता.

आरोप 3 : युएसटी ग्लोबल ही कंपनी कुणाची? त्यात कुणी ओएसडी आहे का?

उत्तर : युएसटी ग्लोबल कंपनीसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझे आणि या कंपनीचे काहीच संबंध नाहीत. माझे शिक्षण हे हार्वड स्कुल ऑफ गर्व्हनमेंट येथे झालेले आहे. तर आरोपात नमूद केल्याप्रमाणे ‘हार्वर्ड स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’ अशी संस्था अस्तित्त्वातच नाही.

तसेच युएसटी ग्लोबलच्या कुठल्याही अधिकार्‍यांचे माझ्यासोबत एकत्र शिक्षण झालेले नाही. त्यामुळे हे संपूर्ण आरोप निराधार, बिनबुडाचे आहेत. रोहित पवारांनी असे आरोप करण्यापूर्वी थोडा अभ्यास केला असता, तर अधिक बरे झाले असते. त्यामुळे 'हार्वर्ड स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स'सारखे हास्यास्पद विनोद किमान टाळता आले असते.

आरोप 4 : एखादा व्यावसायिक उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी कसा असू शकतो? त्यांची खाजगी कंपनीत गुंतवणूक आहे.

उत्तर : माझा कुठलाही व्यवसाय नसून माझी कोणत्याही खासगी कंपनीत गुंतवणूक नाही. 2014 ते 2019 आणि 2022 ते आजपर्यंत या संपूर्ण काळात मी कुठल्याही व्यावसायिक प्रतिष्ठानाशी, कंपनीशी संबंधित नव्हतो आणि नाही. त्यामुळे माझ्या आयकर विवरणातून याची सहजपणे घेता आली असती. शिवाय, 2020 आणि 2021 या काळात मी विदेशात रहायला गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले. याही आरोपात देखील तथ्य नाही. मी या दोन्ही वर्षांत मी मुंबईत वास्तव्याला होतो. तसेच नियमितपणे विरोधी पक्षनेता कार्यालयात माझे नियमित काम सुद्धा करीत होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT