Maharashtra Corona Update: आज राज्यभरात आढळले नवीन ८३ रुग्ण; पुण्यात वाढला कोरोना रुग्णांचा आकडा

Corona Update: आज राज्यात १२,९१७ कोविड चाचण्या झाल्या. त्यात आरटी-पीसीआर चाचण्या २५०९ आणि आरएटी चाचण्या १०,४०८ झाल्या असून आज पॉझिटीव्हीटी रेट ०.६६ टक्के होता. कोरोनाबाधित रुग्णांमधील ७२८ जणांना ग्रह विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर ४५ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Corona Update
Corona UpdateSaam Tv
Published On

Maharashtra Corona Update:

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला असून यात आज नवीन ८३ रुग्णांची भर पडली. या आकडेवारीनुसार, सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा ७०५ वर पोहोचलाय. त्याचबरोबर कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-१च्या रुग्णातही वाढ होत असून ही संख्या २५० वर पोहोचलीय. सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यात आढळून आलीय. (Latest News)

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मेट्रो शहरात जेएन-१ कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर नागपूरमध्ये ३०, मुंबई -२२, सोलापूर ९ अशी संख्या आज आढळलीय. राज्यातील सक्रीय रुग्ण मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १५५, ठाणे- ३,ठाणे मनपा-७३, नवी मुंबई मनपा-७९, कल्याण डोंबिवली मनपा-१६ असे रुग्ण आढळून आले आहेत. \

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ जानेवारी २०२३ पासून ते आतापर्यंत १४३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यापैकी ७१.३३ टक्के रुग्ण हे ६० वर्षावरील आहेत, तर ८५ टक्के लोकांना इतर आजारदेखील होते. तर मृत पावलेल्या १५ टक्के लोकांना कोरोनाने ग्रासले होते. आज राज्यात १२,९१७ कोविड चाचण्या झाल्या.त्यात आरटी-पीसीआर चाचण्या २५०९ आणि आरएटी चाचण्या १०,४०८ झाल्या असून आज पॉझिटीव्हीटी रेट ०.६६ टक्के होता.

कालच्या आकडेवारीनुसार ७७३ रुग सक्रीय होते. कोरोनाबाधित रुग्णांमधील ७२८ जणांना ग्रह विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर ४५ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील २४ जणांना अतिदक्षता विभागात ठेवलं आहे.

Corona Update
Corona News: देशात मागील २४ तासांत नवीन ५१४ कोरोना रूग्णांची नोंद, ३ मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com