Breaking News Live Updates : आजपासून ३ दिवस जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगास सुरूवात

Maharashtra Breaking Updates Live in Marathi: १३ जानेवारी २०२४, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...
Breaking News Live Updates
Breaking News Live UpdatesSaam TV
Published On

आजपासून ३ दिवस जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगास सुरूवात

उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत. नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे आजपासून तीन दिवसीय महानाट्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मुंबईच्या मालाडमध्ये धावत्या कारने घेतला अचानक पेट

मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालाड लिंक रोडवरून जाणाऱ्या कारने पेट घेतल्याची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारला लागलेल्या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

आग लागताच गाडीतील चालक आणि त्यासोबतचे सहप्रवासी तात्काळ गाडीतून उतरले. त्यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र कारला आग लागल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी उसळली. मालाड लिंक रोड डी मार्ट समोर कारला आग लागल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार, फुंकणार निवडणुकांचं रणशिंग

महायुतीच्या उद्यापासून महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार करणार आहे. मुंबईतून मेळाव्यांना सुरुवात होणार आहे. महायुती एकसंघ असल्याचा नारा या महाएल्गारमधून देण्यात येणार आहे. महायुती उद्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे.

भाजप नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्या ६ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचे आयोजन केलं आहे. तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गजानन कीर्तिकर, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे नेते संध्याकाळी ७ वाजता रंगशारदा सभागृहात करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

पुण्यातील मार्केटयार्डात झोपडपट्टीला भीषण आग, चार झोपड्या जळून खाक

पुण्यातील मार्केटयार्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर गल्ली क्रमांक 11 मध्ये सव्वा चारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये चार झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. या आगीची आठ झोपड्यांना आगीची झळ बसली आहे.

आगीमध्ये एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. चार सिलिंडर बाहेर काढले आहेत. आगीच्या घटनेच्या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्याचे काम करत आहेत. ही आग आटोक्यात आली आहे. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

भिंवडीत इमारतीच्या तळ मजल्याला भीषण आग

भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात पाच मजली इमारतीच्या तळ मजल्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या मीटर बॉक्स रूममध्ये ही भीषण आग लागली आहे. आगीमुळे इमारतीत खळबळ उडाली. या इमारतीत क्लासेस, दवाखाना, भाजप आमदार महेश चौगुले यांचे कार्यालय देखील आहे. अर्ध्या तासांत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचं पत्र

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने पत्र पाठवलं आहे. ७ समन्स पाठवूनही चौकशीला का हजर राहिले नाहीत, असा सवाल पत्राद्वारे ईडीने विचारला आहे. १६ ते २० जानेवारीदरम्यान उत्तर देण्याच्या आणि चौकशीला हजर राहण्याच्या सूचना ईडीने दिल्या आहेत.

यापूर्वीच सोरेन यांनी ईडीला पत्र लिहून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत माझी छबी खराब करत असल्याचा आरोप केला होता. आता सोरेन हे चौकशीला हजर होतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. येत्या २२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

डोंबिवलीत पलावा सिटीतील इमारतीला भीषण आग (VIDEO)

डोंबिवलीतील पलावा सिटीतील इमारतीत भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, आठव्या मजल्यापासून ते अठराव्या मजल्यापर्यंत ती पसरली होती. 

बातमी वाचा सविस्तर

मल्लिकार्जुन खरगे होणार INDIA आघाडीचे संयोजक?

INDIA आघाडीचे संयोजक मल्लिकार्जुन खरगे होण्याची शक्यता

आजच्या बैठकीत अनेक नेत्यांनी खरगे यांनी संयोजक व्हावे अशी मांडली भूमिका - सूत्र

नितीश कुमार यांनी स्वतः संयोजक होण्यास इच्छुक नसल्याचं जाहीर केल्याची माहिती

INDIA आघाडी मजबूत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत - नितीश कुमार

मविआच्या जागावाटपावरून काँग्रेसचा एक गट नाराज?

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या एका गटात नाराजीचा सूर

ठाकरे गट जागेबाबत‌ दावा करत असताना काँग्रेसची मात्र सबुरीची भूमिका

काँग्रेसच्या या भूमिकेमुळं मिलिंद देवरा गट‌ नाराज, सूत्रांची माहिती

या नाराजीमुळं काँग्रेस प्रभारी मुंबई दौऱ्यावर असताना देवरा गटानं फिरवली ‌बैठकीकडे पाठ?

- सुनील काळे, मुंबई प्रतिनिधी

देशात तोड नाही असं काम शरद पवारांचे; बाळासाहेबांकडून कौतुकाचा वर्षाव

देशात तोड नाही असं काम शरद पवारांचे आहे, असे कौतुकोद्गार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सर्वांमध्ये समतोल ठेऊन काम करणारे शरद पवार हे कायम उदाहरण आहेत. विघ्नहर साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरण लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळाव्यात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते.

उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. गद्दारांना येत्या निवडणुकीत गाडून टाका, असे उद्धव ठाकरे कल्याणमध्ये म्हणाले.

पुण्यात मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचे भाषण

तुमचं गाव स्वच्छ ठेवा, संरपंचांना मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सल्ला

तुम्ही पहिल्या राजकीय टप्प्यात पाय ठेवलं आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच मागासलेपण तपासायला सुरुवात झाल्याची माहिती आहे.

याबाबत आयोगामार्फत जाहीर सूचना देखील देण्यात आली आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करायची असल्यांस ५०० शब्दांच्या मर्यादेत १९ तारखेपर्यत आयोगाकडे पाठवण्यात याव्यात, असंही सांगण्यात आलं आहे.

बसपा प्रमुख मायावतींना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राजकीय नेत्यांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. बसपा प्रमुख मायावतींना देखील २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याच निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. VHP कडून मायावती यांना निमंत्रण पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे मायावती सोहळ्याला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या, चौथ्यांदा ईडीचे समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीने समन्स बजावलं आहे. येत्या १८ जानेवारी रोजी चौकशीला हजर राहा, असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी देखील तीनवेळा केजरीवाल यांना समन्स बजावलं होतं.

मात्र, केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. हे समन्स राजकीय द्वेशापोटी असल्याचं म्हणत भाजपवर टीका केली होती. आता चौथ्यांदा समन्स बजावल्यानंतर केजरीवाल चौकशीला हजर राहतात, की पुन्हा केराची टोपली दाखवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; वर्षभरात 50 गुंडांवर मोक्का

छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वाढणारी गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी गतवर्षी पोलिसांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार असलेल्या एमपीडीए कायद्याचा गुन्हेगारांना चांगला धक्का बसतोय.

एमपीडीए कायद्यांतर्गत गेल्या वर्षभरात शहरातील 18 जण तर जिल्ह्यातील 8 गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले असून तब्बल 50 गुंडांना मोक्का कायदा ही लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आली.

इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक

INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

सकाळी 11.30 वाजता या ऑनलाईन बैठकीला सुरुवात होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती.

जागावाटप, निमंत्रकाच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक राज्यातील जागावाटप बाबत काही अंशी चर्चा झाली आहे. मात्र काही ठराविक जागांबाबत बैठकीत पुन्हा चर्चा होईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

फेसबुकला हायकोर्टाचा दणका, कायदेशीर कारवाई करण्याचे सायबर पोलिसांना निर्देश

नायलॉन मांजा प्रकरणात निष्काळजीपणा दाखवीत असल्यामुळे फेसबुकला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. फेसबुकवर मांजाची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने सायबर पोलिसांना दिले आहेत. फेसबुकने ऑनलाईन नायलॉन मांजा विकू नये म्हणून न्यायालयाने निर्देश दिले होते. मात्र, तरी देखील फेसबुकवरून मांजा विक्रीचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय.

नवी मुंबई ते मुंबई प्रवास अवघ्या २० मिनिटात, आजपासून अटल सेतू वाहतुकीसाठी खुला

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे देशातील सर्वात लांब सागरी सेतूमुळे मुंबई शहर आणि पनवेल तसेच नवी मुंबईमधील अंतर कमी होणार आहे याआधी या प्रवासाला तब्बल एक ते दीड तास लागायचा तो प्रवास केवळ २० मिनिटात पूर्ण होणे अपेक्षित आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाचं लोकार्पण केलं असून आज सकाळी ८ वाजेपासून हा पूल प्रवासासाठी खुला होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com