Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Statement  SAAM TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरेंनी खोटी शपथ घेतली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी खोटी शपथ घेतली, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत बोलताना केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Devendra Fadnavis took a jibe on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी खोटी शपथ घेतली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. भाजपच्या महाविजय २०२४ या अभियानांतर्गत भिवंडीत आमदार, खासदारांचे प्रशिक्षण वर्ग भरवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अलिकडच्या काळात काही लोक खोट्या शपथा घेत आहेत. पोहोरादेवीला जाऊन त्यांनी शपथ घेतली. मला विश्वास आहे, त्यानंतर त्यांनी मनातल्या मनात देवीकडे माफी मागीतली असेल की मला राजकारणासाठी खोटी शपथ घ्यावी लागतेय, मला माफ कर. देवी निश्चत त्यांना माफ करेल".

फडणवीस पुढे म्हणाले, "त्यावेळी युतीची बोलणी सुरू होती. ती अंतिम टप्यात असताना एका रात्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींनी सांगितलं की हे सगळं जरी बरोबर असलं तरी मी दोन दिवसांपूर्वी अमित भाईंशी बोललो होतो. फोनवर माझं बोलणं झालं होतं. मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला एकदा तरी मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. मी म्हटलं मला हे मन्डेट नाही. मी आत्ता अमित भाईंशी बोलतो". (Breaking News)

"मी रात्री एक वाजता अमित भाई यांना फोन लावला. सांगितलं की बोलणी अंतिम टप्प्यात चालली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शीट वगैरे सर्व काही ठरलं आहे, पण काही काळाकरता आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे. त्या संदर्भात मी कॉम्फिडन्ट नाही. तुम्ही तुम्ही सांगा काय करायचं ते. त्यांनी सांगितलं की मी त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की मुख्यमंत्री पदासंदर्भात वर्षानुवर्षे आपला फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे या संदर्भात कुठलीबी तडजोड होणार नाही. तुम्हाला मंत्रीपदं जास्ती पाहिजे आहे, ते आम्ही देऊ, काय खाते पाहिजे आणि ते आम्ही देऊ. पण मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असेल. हे जर होत नसेल तर तुम्ही बोलणी थांबवा." (Latest Political News)

"मी उद्धवजींना सांगितलं की मी आत्ता अमितभाईंशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री पद देता येणार नाही आणि मग उद्धवजी म्हणाले हे होणार नसेल तर युती करणं कठीण आहे. यानंतर ते त्यांच्या घरी गेले, मी माझ्या घरी गेलो आणि डायलॉग संपला." (Latest Marathi News)

"तीन दिवसांनंतर एक मध्यस्थी पुन्हा आमच्याकडे आले आणि मला म्हणाले की त्यांची पुन्हा बोलायची इच्छा आहे. मी म्हटलं पुन्हा बोलायची इच्छा असेल तरी मॅन्डेट हे आहे. ते म्हणाले आता त्यांनी तो अग्रह सोडला. आता त्यांचे म्हणणे असे आहे की पालघर जागा आम्हाला मिळावी. मी पुन्हा एकदा वर विचारलं आणि त्यांना सांगितलं की त्यांचा आग्रह आहे. मला आपले वरिष्ठ नेते म्हणाले, शिवसेनेसोबत आपली २५ वर्षांची युती आहे. त्यामुळे ती एका जागेसाठी तुटता कामा नये. ती जागा त्यांना हवी असेल तर द्या."

"त्यानंतर आम्ही बसलो, तिथे निर्णय झाला की आता मुख्यमंत्रिपदाचा विषय सील झालेला आहे, आता तो विषय नाही. पालघरची एक जागा आपल्या खासदारासहित आपण त्यांना दिली आणि त्याच्यानंतर आपली युती झाली."

"मी पुन्हा सांगतो, ज्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल ते वारंवार सांगतात, त्याच खोलीमध्ये माननीय अमितभाई, त्याच्यानंतर उद्धवजी आणि मलाही त्यांनी बोलवलं. मी जाण्याआधी १५ मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. मी गेलो तेव्हा मला सांगितलं की, तू एकट्यानीच बोलायचं आम्ही काही बोलणार नाही. प्रश्न उत्तरं नको. पत्रकार परिषदेत मी काय बोलायचं याचा सराव देखील तिथे झाला. जे तिथे ठरलं मी तंतोतंत तेच बोललो. आजही सांगतो की उद्धवजींचे शब्द असे होते की, बघा मी खूप टोकाचं बोललोय. आता मी युटर्न घेतोय त्यामुळे मी सेफ झालो पाहिजे असं तुम्ही बोला. त्यानंतर मी अतिशय तोलामोलाच्या शब्दात त्याठिकाणी बोललो" असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT